दिवाळी म्हणजे खूप सणांनी सजलेला सण. लक्ष्मीपुजन, पाडवा, भाऊबीज यांसारखे सण सगळे मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतात. सुंदर ट्रेडिशन कपडे, दागिने, फराळ, रांगोळी या सगळ्या गोष्टी आपण दिवाळीत करतो. मात्र त्यात स्त्रियांचा आवडता आणि महत्वाचा विषय म्हणजे सजणे. तर, वरीलपैकी कोणत्याही कार्यक्रमासाठी तयार होताना मेकअप करण्यासाठी या काही गोष्टी फॉलो करायला विसरु नका.
काजळ हे सगळ्या स्रियांच्या जवळचे मेकअप प्रोडक्ट आहे. मेकअप सगळ्याच स्रिया करतात. पण काही स्त्रियांना नॅचरल पद्धतीचा मेकअप करायला आवडतो. त्या स्त्रियांना काजळ खूप जवळचे असते. काजळ आणि लिपस्टीक तुमच्या चेहऱ्याला अगदी रेखीव बनवतात. मात्र काही वेळेस तुमचे काजळ डोळ्याखाली जास्त पसरते. त्याने तुमच्या लुकची पुर्णपणे वाट लागते. यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करु शकता.
तुमचा चेहरा ऑयली असेल तर तुमचे काजळ पसरु शकते. यासाठी तुम्ही मेकअप करताना कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करु शकता. तुमचे काजळ डोळ्याखाली येत असेल तर तुम्ही टाल्कम पावडर लावू शकता. त्याने डोळ्याखाली जास्त पाणी किंवा घाम साचत नाही. टाल्कम पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावताना त्याच्या स्टेप्स फॉलो करणे गरजेचे आहे. आधी टाल्कम पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावा मग तुम्ही डोळ्यात काजळ लावा. हे झाल्यावर पुन्हा टाल्कम पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावा. ही पद्धत फॉलो केल्याने तुमचे काजळ पसरणार नाही.
तुम्ही बऱ्याच वेळेस स्मज प्रूफ काजळ विकत घेता. काही लोक खूप महागडे काजळ विकत घेतात. तरीही तुमचे काजळ काही वेळात पसरते. अश्यावेळेस तुम्ही आयलाईनरतचा वापर करु शकता. आय लाईनरने तुम्ही काजळ लावल्यावर एक बारीक आकाराची लाईन काढावी. त्यामुळे तुमचे डोळे आहेत त्यापेक्षा सुंदर आणि ठळक दिसतील. तसेच तुमचे काजळ पसरणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.