Keep Lizards and Roaches Away Instantly Saam
लाईफस्टाईल

घरात कॉकरोच अन् पालींचा वावर वाढलाय? कापसाचा करा 'असा' वापर; मिनिटांत पाली गायब

Keep Lizards and Roaches Away Instantly: पाली आणि कॉकरोच घरात वाढल्यास आरोग्याचा धोकाही वाढतो. केमिकलयुक्त स्प्रेऐवजी नैसर्गिक उपाय वापरणे केव्हाही सुरक्षित.

Bhagyashree Kamble

ऋतू कोणताही असो, घरात कीटक, डासांसोबत पाली आणि कॉकरोचाही वावर दिसतो. जर, या किटकांना वेळेत घरातून पळवून लावले नाही, तर घरात रोगराई पसरू शकते. घरातील कोणत्यातरी कोपऱ्यात पाल दिसते. अनेकदा पाली अन्न किंवा पेयांमध्ये पडण्याची भीती असते. पाली आणि कॉकरोच विषारी असतात. स्वयंपाकघरात पालींचा वावर वाढला तर, शिजवलेल्या अन्नावर सतत लक्ष ठेवावे लागते.

त्यामुळे वेळेत किटकांना पळवून लावणे गरजेचं आहे. कॉकरोच आणि पालींना पळवून लावण्यासाठी बाजारात बऱ्यात केमिकल प्रॉडक्ट्स मिळतात. पण हे प्रॉडकट्स आरोग्यासाठीही धोकादायक ठरतात. जर आपल्याला केमिकलयुक्त प्रॉ़क्ट्स वापरायचे नसतील तर, कापसाचा वापर करा. मिनिटांत घरातून कॉकरोच आणि पाली पळ काढतील.

कॉकरोच आणि पालींना पळवून लावण्यासाठी कापसाचा करा वापर

  • सर्वात आधी कापसाची वात तयार करा.

  • एका भांड्यात ५-७ कापूरच्या गोळ्या घ्या. त्याची पावडर तयार करा.

  • नंतर कापूरच्या गोळ्यांच्या पावडरमध्ये डेटॉल लिक्विड घालून मिक्स करा. जेणेकरून कापूर पूर्णपणे विरघळेल.

  • आता या मिश्रणात कापसाच्या वाती बुडवून ठेवा.

  • नंतर कापसाचे गोळे सेफ्टी पिनमध्ये घाला. हे सेफ्टी पिन अशा ठिकाणी लटकवा, जिथे कॉकरोच आणि पालींचा अधिक वावर आहे. या मिश्रणातील तीव्र गंधामुळे पाली आणि झुरळे त्या ठिकाणी पुन्हा फिरकणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ

बुरशी लागलेला कांदा खाताय, सावधान! कांद्यात जीवघेणं ब्लॅक फंगस?

येत्या २ महिन्यात राज्याचा CM बदलणार? महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

भाजप- शिंदेसेनेचं पुन्हा फिस्कटणार? 13 महापालिकांवरून महायुतीत रस्सीखेच

Raigad : विद्यार्थिनी अलिबागहून महाडला स्पर्धेत आली, अचानक शाळेच्या मैदानात कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT