High Blood Pressure Effects google
लाईफस्टाईल

High Blood Pressure Risk: सायलेंट किलर! लक्षणांशिवाय वाढतोय 'BP'चा धोका; डॉक्टरांनी सांगितले ५ गंभीर संकेत

Silent BP Symptoms: मोबाईलचा जास्त वापर, ताण, कमी झोप आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतोय. डॉक्टरांनी याला सायलेंट किलर म्हंटल आहे.

Sakshi Sunil Jadhav

तुम्हाला तुमचा वेळ वाया घालवायला मोबाइल हवा असतो ना? मोबाइल शिवाय आत्ता फार काळ जगणं जरा कठीणच आहे. पण यामध्ये जाणारा वेळ तुमच्या इतर नियोजनांचं आणि त्यात शरीराचं नुकसान करतोय. यामध्ये विशेषत: तरुणाई ही मोबाइलचा वापर इतका करते की, त्यांच्या खाण्याच्या, झोपेच्या वेळा बदलतात. इतर शरीराला फायदेशीर गोष्टी करण्यासाठी त्यांना वेळ नसतो. त्यामुळे सध्या तरुणाईमध्ये ब्लड प्रेशरच्या समस्या जाणवायला लागल्यात.

BP ची कारणं

हाय ब्लड प्रेशरचा त्रासचं कारण म्हणजे तुमची जीवनशैली. तुम्ही फक्त घरचं खाता म्हणून फीट आहात, असा समज इथे चुकीचा ठरतो. जास्त ताण, काम, आहार चुकीच्या गोष्टी, कमी झोप आणि व्यायाम नसेल तर तुम्हाला ब्लड प्रेशरच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. पण BPची लक्षणं म्हणजे छातीत दुखणंच नाही. याची आणखी लक्षणं आहेत. ज्याला डॉक्टर सायलेंट किलर सुद्धा म्हणतात. कारण याची लक्षण ठळकपणे दिसत नाहीत. पण वेळेवर उपाय केले नाहीत तर तुम्हाला भविष्यात किडनी आणि ब्रेनशी संबंधीत समस्यांना सामोरं जावं लागतंय.

तरुणांमध्ये वेगाने वाढतोय BPचा त्रास

तरुणांमध्ये सध्या ब्लड प्रेशरच्या समस्या झपाट्याने वाढतायेत. कारण तरुण मंडळी खूप स्ट्रेस घेतात, झोपेच्या वेळेला जागून काम करतात किंवा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात, कमी झोप घेतात, जास्त मीठ घातलेले पदार्थ खातात यामुळे BPचा त्रास वाढत चालला आहे.

फिट दिसणारे लोकांना BPचा धोका असतो का?

तज्ज्ञांच्या मते, जे लोक बाहेरुन फिट दिसतात, ते लोक आतून या आजाराशी लढत असतात. त्यामुळे त्यांच्या फक्त हार्ट नाही तर मेंदू, किडनी आणि शरीराच्या इतर भागांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जमेल तितकी हेल्दी खाल्लं पाहिजे. व्यायाम केलाच पाहिजे यात जर तुम्ही मागे राहीलात तर तुम्हाला कमी वेळातच तुमचा जीव गमवावा लागू शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cockroach Janata Party: सरकारला प्रश्न विचारणारे पाकिस्तानी आहेत का? अभिजीत दीपके यांचा सवाल

Maharashtra News Live Update: पुण्यातील हाऊस पार्टीमध्ये आलेल्या पोरांची मुजोरी

Shocking : १९ वर्षीय प्रेयसीला संपवलं! मृतदेह जंगलात फेकला; हैवान बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य

PF Interest Rate: सरकार तुमच्या पीएफचं व्याज खात्यात कधी जमा करेल? डेडलाईन का चुकली? PFची नवीन अपडेट

Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सूनचा कहर, पुढचे ४८ तास महत्वाचे; १९ राज्यांना अलर्ट

SCROLL FOR NEXT