Stomach Ulcer Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Stomach Ulcer: पोटात अल्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'हे' बदल; ९९% लोकं करतात इग्नोर

Stomach Ulcer Symptoms : पोटात अल्सर झाल्यास लहान आतड्याच्या अस्तरात एक जखम तयार होते. यामुळे तुम्हाला पोटदुखी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. पोटाच्या अल्सरमध्ये काय लक्षणं दिसून येतात ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागले आहेत. यामध्ये पोटाशी संबंधित आजारांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात दिसून येतंय. गॅस, अपचन, पोट फुगणं इत्यादी तक्रारी सामान्य आहेत, परंतु पोटात अल्सर झाल्यास ते गंभीर स्वरूपाचं असू शकतं.

पोटात अल्सर झाल्यास लहान आतड्याच्या अस्तरात एक जखम तयार होते. यामुळे तुम्हाला पोटदुखी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. या समस्येवर वेळेवर उपचार आणि योग्य काळजी घेतल्यास तुमची समस्या कमी होऊ शकते. या समस्येवर वेळेवर उपचार करण्यासाठी पोटाच्या अल्सरची लक्षणं काय दिसून येतात, ती जाणून घेतली पाहिजेत. पोटाच्या अल्सरमध्ये काय लक्षणं दिसून येतात ते पाहूयात.

कारणाशिवाय वजन कमी होणं

पोटात अल्सर झाल्यास रुग्णांची भूक लक्षणीयरीत्या कमी होते. परिणामी याचा प्रभाव त्यांच्या वजनावरही दिसून येतो. अशावेळी वजनही झपाट्याने कमी होऊ लागते. अनेकदा लोक त्यांच्या कमी होत असलेल्या वजनाकडे दुर्लक्ष करतात. मात्र असं करणं धोकादायक ठरू शकतं.

पोटात मळमळ होणं

जेव्हा पोटात अल्सर होतो तेव्हा लहान आतड्याच्या अस्तरावर जखम होते. अशावेळी रुग्णांना तीव्र मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो. वारंवार हे लक्षणं तुम्हाला दिसून येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांची मदत घ्या.

पोटाच्या वरच्या भागात तीव्र वेदना

पोटात अल्सर झाल्यास रुग्णांना पोटाच्या वरच्या भागात वेदना होऊ शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या वेदना सौम्य किंवा तीव्र असू शकतात. जर तुम्ही वारंवार पोटदुखीची तक्रार करत असाल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

सतत ढेकर येणं

पोटात अल्सर असलेल्या रूग्णांना आतिप्रमाणात ढेकरचा त्रास होतो. यामध्ये जेवल्यानंतर किंवा काहीही खाल्ल्यानंतर ढेकर येण्याचं प्रमाण वाढतं. जर तुम्हाला जास्त ढेकर येण्याची समस्या असेल तर एकदा नक्कीच स्वतःची तपासणी करा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर उपचार मिळू शकतील.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT