Fatty liver warning SAAM TV
लाईफस्टाईल

Fatty liver warning: लिव्हर खराब झाल्याचे संकेत चेहऱ्यावर दिसतात; हे ३ बदल दिसल्यास लगेच डॉक्टरकडे धावा

Liver damage signs on face: आरोग्यतज्ज्ञांच्या मते, यकृत खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे चेहऱ्यावर दिसतात. मात्र बहुतांश लोक ही लक्षणे दुर्लक्षित करतात आणि त्यामुळे आजार गंभीर होतो.

Surabhi Jayashree Jagdish

फॅटी लिव्हर डिसीज ही जगभरातील सर्वात सामान्य लिव्हरची समस्या आहे. हा आजार बहुतेक वेळा कोणतीही मोठी लक्षणं न दाखवता शरीरात होत असतो. जसा हळूहळू हा आजार वाढत जातो तशी त्याची लक्षणं दिसून येतात. जास्त प्रमाणात मद्यपान हे याचं मुख्य कारण मानलं जातं. त्याचप्रमाणे स्थूलता, टाईप 2 डायबिटीज, उच्च रक्तदाब आणि जास्त कोलेस्टेरॉल यांसारख्या समस्या देखील लिव्हरमध्ये चरबी साचण्यास कारणीभूत ठरतात.

मायो क्लिनिकच्या माहितीनुसार, Metabolic Dysfunction-Associated Steatotic Liver Disease (MASLD) हा आता जगातील सर्वात सामान्य लिव्हरचा आजार झाला आहे. लवकर निदान करणं अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण उपचार न केल्यास फॅटी लिव्हर पुढे Metabolic Dysfunction-Associated Steatohepatitis (MASH) या गंभीर स्वरूपात बदलतो.

MASH मध्ये यकृताचा आकार वाढणं आणि काही प्रमाणात कॅन्सर होण्याची शक्यता असते. आश्चर्याची बाब म्हणजे याची काही सुरुवातीची लक्षणं तुमच्या चेहऱ्यावर दिसू शकतात. ही लक्षणं नेमकी कोणती आहेत ता पाहूयात.

चेहऱ्यावर सूज

यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यास त्याचं एक प्रमुळ लक्षण म्हणजे चेहऱ्यावर सूज येणं. विशेषतः डोळ्यांभोवती आणि गालांवर यामध्ये सूज येऊ लागते. यकृताला हानी झाल्यास आवश्यक प्रोटीन उत्पादन कमी होतं ज्यामुळे शरीरातील द्रव संतुलन आणि रक्ताभिसरणावर परिणाम होतो. चेहऱ्यावरील सूज लवकर ओळखल्यास वेळेत वैद्यकीय तपासणी करून या समस्येवर उपाय केले जाऊ शकतात.

मान काळसर होणं

मानेच्या ठिकाणी काळसर डाग दिसणं याला वैद्यकीय भाषेत Acanthosis Nigricans म्हणतात. हे इन्सुलिन रेसिस्टन्सशी संबंधित असतं. रक्तातील इन्सुलिनचं प्रमाण वाढल्यामुळे त्वचेतील रंगद्रव्यांमध्ये बदल होतो आणि त्वचा काळसर दिसू लागते. त्यामुळे तुम्हाला हे लक्षण दिसत असल्यास वेळीच त्यावर उपचार करावेत.

चेहऱ्यावर लालसरपणा येणं

दीर्घकालीन लिव्हरच्या आजारांमध्ये कधी कधी चेहऱ्यावर सतत लालसरपणा, रक्तवाहिन्या दिसणे किंवा काही गाठी-पुरळ दिसू शकतात. हा त्रास केवळ यकृतामुळे होत नाही पण जर तो चेहऱ्यावरील सूज किंवा काळसर त्वचेबरोबर दिसत असेल तर यकृताशी संबंधित समस्या असण्याची शक्यता असते.

इतर चेहऱ्यावर दिसणारे संकेत

फॅटी लिव्हरमुळे कावीळ होण्याचीही शक्यता असते. ज्यामध्ये त्वचा आणि डोळे पिवळसर होतात. हे बिलिरुबिनच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे होते. काही लोकांना रक्तात पित्तसाल्ट्स (bile salts) साचल्यामुळे चेहऱ्यावर खाज येऊ शकते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ

बुरशी लागलेला कांदा खाताय, सावधान! कांद्यात जीवघेणं ब्लॅक फंगस?

येत्या २ महिन्यात राज्याचा CM बदलणार? महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

भाजप- शिंदेसेनेचं पुन्हा फिस्कटणार? 13 महापालिकांवरून महायुतीत रस्सीखेच

Raigad : विद्यार्थिनी अलिबागहून महाडला स्पर्धेत आली, अचानक शाळेच्या मैदानात कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT