Stroke Symptoms 1 Month Before saam tv
लाईफस्टाईल

Stroke Symptoms: स्ट्रोक येण्याच्या १ महिनापूर्वी शरीरात दिसतील 'हे' बदल; अनेकजण करतात लक्षणांना इग्नोर

Stroke Symptoms 1 Month Before : मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित झाला नाही तर नसेल किंवा रक्तपुरवठ्यात अडथळे येत असतील तर अशा स्थितीत मेंदूला योग्य प्रकारे कार्य करण्यात अडचण येते.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या प्रत्येक हालचालीचं कार्य योग्य राहण्यासाठी मेंदूचं आणि मेंदूच्या नसांचं आरोग्य जपणं महत्त्वाचं असतं. आपल्या मेंदूला योग्य रक्तपुरवठा होत असेल तेव्हाच आपलं कार्य अधिक चांगलं होतं. काही कारणास्तव रक्तपुरवठा व्यवस्थित झाला नाही तर नसेल किंवा रक्तपुरवठ्यात अडथळे येत असतील तर अशा स्थितीत मेंदूला योग्य प्रकारे कार्य करण्यात अडचण येते.

मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी झाल्याने ऑक्सिजनचा पुरवठाही बंद होऊ लागतो. अशावेळी संबंधित व्यक्तीला स्ट्रोक येण्याची शक्यता खूप जास्त असते. मुख्य म्हणजे काही कारणाने मेंदूला होणारा रक्तपुरवठा पूर्णपणे बंद झाल्यास स्ट्रोक येऊ शकतो. दरम्यान स्ट्रोक येण्याच्या तब्बल १ महिन्यापूर्वी शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. ही लक्षणं नेमकी काय असतात ती जाणून घेऊया.

बोलण्यात अडथळे येणं

काही कारणास्तव तुम्हाला अचानक बोलण्यात अडचण येत असेल किंवा तुम्ही थांबून-थांबून बोलत असाल तर ही चिन्हं स्ट्रोकची असू शकतात. बोलण्याच्या क्षमतेचा थेट संबंध मेंदूशी असतो. अशा परिस्थितीत मेंदूमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास रुग्णांना बोलण्यात अडचण येऊ शकते.

डोळ्यांसमोर सतत अंधारी येणं

स्ट्रोकच्या तब्बल एक महिना पूर्वी शरीरात अनेक बदल दिसून येतात. ज्यामध्ये काही लोकांना वारंवार डोळ्यांसमोर अंधारी येण्याची समस्या जाणवते. त्याच वेळी, काही लोकांची दृष्टी अस्पष्ट आहे . तुम्हालाही अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

शरीराचा समतोल बिघडणं

मेंदूला ऑक्सिजनचा पुरेशा प्रमाणात पुरवठा न झाल्यामुळे स्ट्रोक येण्याचा धोका असतो. काही लोकांना या स्थितीत वारंवार झटके येणं किंवा शरीराचे समतोल बिघडणं यांसारखी लक्षणं दिसू येण्याची शक्यता असते. जर तुम्हाला अशा प्रकारची लक्षणं दिसून येत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तीव्र डोकेदुखी होणं

स्ट्रोक येण्याच्या काही आठवड्यांअगोदर डोकेदुखीची समस्या जाणवू शकते. ही समस्या इतकी तीव्र असू शकते की, काही तास तुम्हाला ही डोकेदुखी जाणवू शकते. यावेळी डोकेदुखीसोबत उल्टी आणि मळमळ हा त्रास देखील जाणवू शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology Success: 'या' जन्मतारखेच्या लोकांचे बालपण संघर्षमय, पण पुढे आयुष्य बदलून टाकणारी श्रीमंती

Pune Rave Party: मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत राजकीय कनेक्शन उघड, बड्या महिला नेत्याचा पती पोलिसांच्या ताब्यात

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT