Liver Damage Saam Tv
लाईफस्टाईल

Signs Of Liver Damage: यकृत खराब झालं असल्यास रात्रीच्या वेळी शरीर देतं 'हे' संकेत; 99% लोकं करतात इग्नोर

Liver damage signs shows at Night: यकृतात थोडीशीही समस्या निर्माण झाली तर शरीरातील अनेक प्रमुख अवयवांवर परिणाम होऊ शकतो. यकृत खराब झाल्यामुळे शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसून येतात. दरम्यान यापैकी काही लक्षणं रात्रीच्या वेळी अधिक दिसून येतात.

Surabhi Jayashree Jagdish

यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. लिव्हर हे शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्याचं काम करतं. यकृतात थोडीशीही समस्या निर्माण झाली तर शरीरातील अनेक प्रमुख अवयवांवर परिणाम होऊ शकतो. आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी यकृत निरोगी ठेवणं फार गरजेचं आहे. अत्यंत आवश्यक आहे.

सध्याच्या काळात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अयोग्य जीवनशैलीमुळे लोकांमध्ये यकृताशी संबंधित समस्या वाढतायत. यकृत खराब झाल्यामुळे शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसून येतात. दरम्यान यापैकी काही लक्षणं रात्रीच्या वेळी अधिक दिसून येतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. ही लक्षणं वेळीच ओळखली तर यकृताचं नुकसान होण्यापासून संरक्षण करता येऊ शकतं. ही लक्षणं नेमकी कोणती आहेत ते पाहूयात.

पायात सूज येणं

यकृत खराब झाल्यामुळे पाय आणि घोट्याला सूज येण्याची समस्या असू शकते. याशिवाय तुम्हाला त्या भागात वेदना आणि क्रॅम्स देखील जाणवू शकतात. या वेदना अनेकदा रात्री जास्त जाणवू शकतात.

सतत झोपमोड होणं

जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल तर ते यकृत खराब झाल्याचं लक्षण असू शकतं. यकृत निकामी झाल्यामुळे शरीरातील टॉक्सिन्सची पातळी वाढते. या गोष्टीचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर होतो. यामुळे झोपेशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. रात्री झोप न येण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांची मदत घेणं फायदेशीर ठरेल.

थकवा

रात्री खूप थकवा आणि अशक्त वाटणं हे देखील यकृत खराब होण्याचं एक लक्षण असू शकतं. ज्यावेळी तुमचं यकृत योग्यरित्या काम करत नाही तेव्हा शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. ज्यामुळे तुमचं शरीर थकू लागतं आणि अशक्तपणा येतो.

रात्री खाज येणं

रात्रीच्या वेळी त्वचेवर जास्त खाज येत असेल तर देखील यकृत खराब होण्याचं लक्षण असू शकतं. ज्यावेळी यकृत योग्यरित्या काम करत नाही, तेव्हा शरीरात पित्ताची पातळी वाढते. ज्यामुळे त्वचेला खाज सुटू शकते. जर तुम्हाला अशी लक्षणं जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

SCROLL FOR NEXT