Refined Oil Side Effects  Saam Tv
लाईफस्टाईल

Refined Oil Side Effects : जेवण बनवण्यासाठी रिफाइंड तेल वापरताय? आरोग्याला होणारे नुकसानही जाणून घ्या

Is refined oil good for health : चमचमीत जेवण बनवण्यासाठी आपण चांगल्या खाद्यतेलाचा वापर करतो.

कोमल दामुद्रे

Is refined oil safe to consume :

भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफुल, खोबऱ्याचे तेल, पाम तेल यांसारखा तेलाचा हमखास वापर केला जातो. फोडणी देण्यापासून ते रसरशीत भाजी बनवण्यासाठी आपण तेलाचा पुरेपुर वापर करतो.

चमचमीत जेवण बनवण्यासाठी आपण चांगल्या खाद्यतेलाचा वापर करतो. पंरतु, प्रत्येक स्वयंपाकघरात आढळते ते रिफाइंड तेल. या तेलाचा वापर पुरी, पुलाव, चिप्स सारखे पदार्थांमध्ये त्याचा वापर होतो. या तेलाला कोणत्याही प्रकारची चव नसते. त्यामुळे ते अनेकांना आवडते. या तेलाचा अतिरिक्त वापर केल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संशोधनातून असे समोर आले आहे की, रिफाइंड तेलाचे (Oil) सेवन केल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते. या तेलांमध्ये अनेक प्रकारचे फॅट्स असतात. त्यापैकी बहुतेक ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असतात. या फॅट्सचे अतिसेवन करणे शरीरासाठी चांगले नाही. अतिरिक्त प्रमाणात वापर करण्याऱ्यांना हृदयरोग (Heart Disease), मधुमेह (Diabetes) आणि लठ्ठपणा या आजाराचा धोका असू शकतो. या तेलाची प्रक्रिया उच्च तापमानात केली जाते. ज्यामुळे शरीरातील युरिक ऍसिड वाढून सांधेदुखी होते.

1. या तेलाचा वापर करा

डॉक्टर म्हणतात की, रिफाइंड तेलाऐवजी आपण आपल्या आहारात नैसर्गिक तेलाचा वापर करा. यामध्ये खोबऱ्याचे तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा तिळाच्या तेलाचा समावेश करा. यामुळे शरीरात ट्रान्स फॅट वाढत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT