Shri Krishna Janmashtami 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Shri Krishna Janmashtami 2023: तब्बल ३० वर्षांनी शुभ संयोग! श्रीकृष्ण जन्माष्टमीला करा हे उपाय, अपूर्ण इच्छा होतील पूर्ण

Shri Krishna Janmashtami Tithi : श्रावण महिन्यातील तिसरा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रावण महिन्यातील कृष्ण सप्तमीला श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते.

कोमल दामुद्रे

Shri Krishna Janmashtami Date :

श्रावण महिन्यातील तिसरा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रावण महिन्यातील कृष्ण सप्तमीला श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते. त्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात अष्टमीला गोपाळकाला असतो. या वेळी जन्माष्टमीचा उत्सव अष्टमी तिथीला ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३७ वाजता सुरू होईल. तर हा उत्सव 7 सप्टेंबर रोजी दुपारी 4:14 वाजता संपणार आहे.

हिंदू पंचागानुसार यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीला ग्रहांच्या संयोगामुळे तब्बल ३० वर्षांनंतर शुभ संयोग तयार झाला आहे. रवियोग आणि सर्वार्थ सिद्धी योग एकाच वेळी तयार होत आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी रोहिणी नक्षत्र असून चंद्र वृषभ राशीत असेल. जन्माष्टमीच्या (Janmashtami) दिवशी ही दुर्मिळ योग असेल. यामुळे सर्व 12 राशींसाठी हा काळ शुभ असणार आहे. कान्हाच्या कृपेने या दिवशी लोकांची सर्व रखडलेली कामे (Work) पूर्ण होतील.

धार्मिक विद्वानांच्या मते, श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी काही खास करणे खूप फायदेशीर आहे. जन्माष्टमीला श्रीकृष्णाचा पंचामृताने अभिषेक करावा. मग त्या पंचामृताचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. यासोबतच जन्माष्टमीला सुक्या मेव्याची खीर बनवावी. त्या खीरमध्ये तुळशीचे पान टाकून श्रीकृष्णाला अर्पण करा. तसेच श्रीकृष्णाला पंजिरी अर्पण करा. यामुळे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होऊन आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करतील. तसेच आरोग्य (Health) देखील चांगले राहिल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : 'एक मैं और एक तू... ', जेव्हा अमित ठाकरे गाणं गातात | Marathi News

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

SCROLL FOR NEXT