Shravan Recipe 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Shravan Recipe 2023 : उपवासात हेल्दी-टेस्टी पदार्थ ट्राय करायचा आहे? झटपट बनवा राजगिऱ्याचे अप्पे, पाहा रेसिपी

How To Make Upvasache Rajgiryache Appe : याप्रकारे ट्राय करा राजगिऱ्याचे अप्पे, चवी चवीने खाल

कोमल दामुद्रे

Upvasache Rajgiryache Appe in Marathi :

उपवास म्हटलं की, नेमके आपल्याला त्यादिवशी अतिप्रमाणात भूकही लागते व हेल्दी- टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा होते. श्रावण म्हटलं की, या महिन्यात अनेकांचे उपवास असतात. पण उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन आपल्या सगळ्यांना कंटाळा येतो.

पण जर तुम्हाला हेल्दी व टेस्टी अशा पदार्थांची चव चाखायची असेल तर तुम्ही हा पदार्थ ट्राय करु शकता. बरेचदा उपवास केल्यामुळे आपल्या डोकेदुखी किंवा अपचनाच्या समस्येला सामोरे जावे लागते, पण जर तुम्ही राजगिऱ्याचे अप्पे ट्राय केले तर अॅसिडीटीच्या समस्यांपासून वाचू शकता. कसे बनवायचे पाहूया

1. साहित्य

  • बटाटे (Potatoes)- २

  • जिरे - १/२ चमचा

  • हिरव्या मिरच्या - ५

  • दही (Curd) - २ चमचे

  • राजगिरा पीठ - १ वाटी

  • मीठ - चवीनुसार

2. कृती

  • अप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या. थंड झाल्यानंतर ते व्यवस्थितपणे स्मॅश करा.

  • यानंतर राजगिऱ्याचे पीठ चाळून घ्या. त्यात मॅश केलेला बटाटे, जिरे, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची व २ चमचे दही घालून चांगले मिक्स करा व पाणी (Water) घालून बॅटर तयार करा.

  • त्यानंतर पीठात चिमुटभर बेकिंग सोडा घाला १० मिनिटे झाकून ठेवा.

  • अप्पे पात्र गरम करुन त्याला तूप लावून घ्या. ग्रीस करुन झाल्यानंतर त्यात तयार बॅटर टाका. अप्पे तयार झाल्यानंतर दहीसोबत खा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, मुंबईत 'बेस्ट' बसने करा मोफत प्रवास

Amboli Recipe: कोकणातली स्पेशल मऊ, लुसलुशीत अन् जाळीदार आंबोळी कशी बनवायची? वाचा रेसिपी

Yoga Poses For Hunchback: पाठीचा कणा सरळ ठेवण्यासाठी करा ही 5 योगासने

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भरधाव कारची ४ दुचाकींना धडक, २ जण जखमी

Rice Risk: सतत भात गरम करून खाताय? वेळीच सवय मोडा, नाहीतर गंभीर आजाराला द्याल आमंत्रण

SCROLL FOR NEXT