लाईफस्टाईल

Fatty liver and tea: फॅटी लिव्हर असल्यास चहा पूर्णपणे बंद करावा का? डॉक्टरांनी सांगितलं नेमकं सत्य

Fatty liver food: ग्रेड-1 फॅटी लिव्हर असल्यास चहा पूर्णपणे बंद करण्याची गरज आहे का? दूध आणि साखरेचा चहा का टाळावा, ब्लॅक टी घेता येतो का आणि चहा बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल फॅटी लिव्हरची समस्या वाढताना दिसतेय. फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये जास्त चरबी जमा होणे. ही समस्या फक्त मोठ्या माणसांमध्येच नाही, तर तरुण आणि लहान मुलांमध्येही दिसून येते. फॅटी लिव्हरचे वेगवेगळे ग्रेड असतात. त्यापैकी ग्रेड-1 फॅटी लिव्हर ही सुरुवातीची स्टेज आहे. यामध्ये लिव्हरमध्ये थोडी चरबी जमा झालेली असते. चांगली गोष्ट म्हणजे योग्य खाणं, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली ठेवली तर ही समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

पण रिपोर्टमध्ये ग्रेड-1 फॅटी लिव्हर आल्यावर अनेकांना एक प्रश्न पडतो. फॅटी लिव्हर असताना चहा प्यायला चालतो का? एनडीटीव्हीला याबाबत सीके बिर्ला हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अनुकल्प प्रकाश यांनी माहिती दिलीये.

फॅटी लिव्हर असताना चहा प्यायला चालतो का?

डॉक्टरांच्या मते, ग्रेड-1 फॅटी लिव्हर असताना चहा पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. मात्र, चहा कसा घेतो हे महत्त्वाचं आहे. फॅटी लिव्हर असल्यास दूध आणि जास्त साखर घातलेला चहा टाळला पाहिजे. त्याऐवजी ब्लॅक टी तुम्ही पिऊ शकता. ब्लॅक टीमध्ये पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक लिव्हरच्या पेशींना होणारा ताण आणि सूज कमी करण्यास मदत करू शकतात.

डॉक्टरांच्या मते, फॅटी लिव्हरमध्ये चहापेक्षा चहामध्ये घातली जाणारी साखर ही मोठी समस्या ठरू शकते. त्यामुळे जर तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास असेल तर ब्लॅक टी तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

जास्त साखर लिव्हरसाठी का चांगली नाही?

आपण चहा, मिठाई, कोल्ड्रींक किंवा इतर पदार्थांमधून खूप जास्त साखर घेतली तर त्याचा परिणाम लिव्हरवर होऊ शकतो. साखरेमधील फ्रुक्टोज जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास लिव्हर अतिरिक्त साखरेचं चरबीत रूपांतर करू शकतो. त्यामुळे लिव्हरमध्ये आणखी चरबी जमा होण्याची शक्यता वाढते. म्हणून फॅटी लिव्हर असलेल्या व्यक्तींनी चहामध्ये घातली जाणारी साखर कमी करणं महत्त्वाचं आहे.

फॅटी लिव्हरमध्ये कोणता चहा घेता येईल?

ग्रेड-1 फॅटी लिव्हर असल्यास चहा घेताना काही गोष्टी लक्षात ठेवा.

  • दूध आणि जास्त साखर असलेला चहा टाळला पाहिजे.

  • चहा गोड लागण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने स्टीव्हिया वापरता येऊ शकतं

  • चहामध्ये आलं, दालचिनी आणि लवंग घालता येतं

  • वेलची देखील चहामध्ये घालू शकता

  • फुल-क्रीम दूध वापरण्याऐवजी लो-फॅट किंवा स्किम्ड दूध वापरा

  • दूध वापरायचं नसेल तर साखर नसलेलं प्लांट-बेस्ड मिल्क वापरा

  • चहा बनवताना आधी पाण्यात चहापत्ती आणि मसाले उकळून घ्या. त्यानंतर त्यात थोडे दूध घाला.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमपीएससी आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांचा राजकीय स्वार्थ - शिवेंद्रराजे भोसले

Pune Fort : महाराष्ट्रातील 'या' किल्ल्याचे अनोखं रूप पाहिलंत का? दुरून दिसतो टोपीसारखा

Cerebral Palsy: सेरेब्रल पाल्सीवर आता केवळ फिजिओथेरपी नाही; रिजनरेटिव्ह मेडिसिन आणि न्यूरो रिहॅबिलिटेशनमुळे उपचारांना नवी दिशा

SIR: इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान ४२ निवृत्त न्यायाधीशांचे SIR ला समर्थन, थेट देशाच्या नावाने लिहिलं खुलं पत्र

Nana Patekar Death: 'त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही...'; नाना पाटेकरांच्या निधनाने जान्हवी किल्लेकर भावुक

SCROLL FOR NEXT