Brain Strok Warning google
लाईफस्टाईल

Brain Strok Warning: ब्रेन स्ट्रोक कसा ओळखायचा? 'ही' लक्षणं झोपेत दिसतात, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Strok Symptoms: झोपेत हात किंवा पाय वारंवार सुन्न पडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अचानक अशक्तपणा, बोलण्यात अडचण किंवा चेहरा वाकणे ही ब्रेन स्ट्रोकची गंभीर लक्षणे असू शकतात.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या झोपेच्या वेळा आणि पद्धती बदलल्या आहेत. बरीच मंडळी दिवसभर काम केल्यानंतर थकतात. त्यामुळे त्यांना बरेचदा काम करताना अचानक डुलकी येते, ते तिथेच झोपतात. काहीजण रात्रीच्या वेळी जागे राहून काम पूर्ण करतात. मग फोनचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

त्यावेळेस त्यांना कधी झोप लागते हे कळतच. तुम्ही अशावेळेस आहात त्या अवस्थेत झोपता. तेव्हा कधीकधी एका कुशीवर किंवा हातावर झोपता. त्यावेळेस उठल्यानंतर तुमचा हात किंवा पाय सुन्न पडतो. ही समस्या जर खूप वेळा जाणवत असेल तर तो ब्रेन स्ट्रोकचा धोका असू शकतो. असं अमेरिकेतील न्यूरोसर्जन डॉ. ब्रायन होफलिंगर यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले आहे.

मेंदूतील स्ट्रोक कसा ओळखावा याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील बातमी नक्कीच वाचा. चेहरा, हातवर किंवा पायामध्ये अचानक बधिरपणा येणं किंवा अशक्तपणा जाणवणं, अचानक गोंधळल्यासारखं वाटणं, बोलताना अडचण येणे किंवा समजण्यात त्रास होणं ही स्ट्रोकची प्रमुख लक्षणं असतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता लगेचच डॉक्टरांकडे धाव घेणं योग्य ठरतं.

स्ट्रोक म्हणजे मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा अचानक कमी होतो किंवा थांबतो. त्यामुळे मेंदूला पुरेसे ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही. याने मेंदूच्या पेशींना इजा होते आणि मेंदूचं काही कार्य बिघडतं. सोप्या भाषेत सांगायचं तर, रक्तप्रवाह न झाल्यामुळे मेंदूचा एखादा भाग जखमी होतो किंवा त्या भागातील पेशी मृत होऊ शकतात.

स्ट्रोकची लक्षणे सहसा अचानक दिसून येतात. चेहऱ्याचा एक भाग खाली झुकणे, चेहऱ्यात सुन्नपणा जाणवणे, हात किंवा पायात अचानक कमजोरी येणे, स्पष्ट बोलता न येणे किंवा बोलणं पूर्णपणे बंद होणे, तसेच अचानक दृष्टी धूसर होणे किंवा दिसेनासे होणे ही महत्त्वाची चिन्हे आहेत. ही लक्षणे काही वेळातच गंभीर स्वरूप धारण करू शकतात. त्यात जर तुम्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार असतील तर तुम्हाला स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अशा आजारांकडे किंवा काही सुक्ष्म लक्षणांकडे दुर्लक्ष करणं टाळावे.

टीप: ही माहिती केवळ जनजागृतीसाठी असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. आरोग्याविषयी कोणताही प्रश्न असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Tourism : मुंबईजवळचं ठाणे पावसाळ्यात होते स्वर्गाहून सुंदर, वीकेंडला नक्की फिरा 'ही' ठिकाणे

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Delhi : CNG पंपावर मोठा स्फोट, तिघांचा मृत्यू; गॅस भरताना टाकी फुटल्यानं परिसरात खळबळ

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

SCROLL FOR NEXT