वृत्तसंस्था: शेअर मार्केटमध्ये आज जोरदार तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्सने पुन्हा एकदा ६० हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. शेअर मार्केट सुरू होताच काही सेन्सेक्सने (Sensex) ५९९०० अंकाचा टप्पा ओलांडला होता. तर, निफ्टी १७९०० अंकापर्यंत आला होता. आज सकाळी शेअर मार्केटमध्ये (Share Market) शानदार तेजी दिसून आली. सेन्सेक्सची सुरुवात ५९७६४ अंकावर झाली आहे.
हे देखील पहा-
मार्केटमध्ये व्यवहार सुरू होताच सेन्सेक्सने ५९९०० अंकाचा टप्पा गाठला आहे. तर, निफ्टीची सुरुवात देखील चांगली झाल्याचे दिसून आहे. सुरुवातीच्या वेळेमध्ये निफ्टीने (Nifty) १७९०० चा स्तर गाठला आहे. मात्र, काही वेळेनंतर नफा वसुली दिसून आली आहे. सकाळी १०.५ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये १४११ अंकांनी वधारून ६०६९६.८७ अंकावर ट्रे़ड करत होता. तर, निफ्टीमध्ये ४०१ अंकांची उसळण दिसून आली आहे. निफ्टीमध्ये १८,०७१.५० अंकावर व्यवहार करत होता.
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण
आज मार्केट उघडण्या अगोदरच HDFC आणि HDFC बँक विलीन होत असल्याची बातमी आली. HDFC शेअरधारकांना HDFC बँकेचे ४२ शेअर्स मिळणार आहेत. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाच्या बातम्यांमुळे त्यांच्या समभागांमध्ये जोरदार वाढ झाली आहे. HDFC बँक २ वर्षात सर्वात मोठ्या तेजीसह व्यवसाय करत आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.