Navratri 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri 2023 : नवदुर्गेच एक शक्तीपीठ चीनमध्ये, मानसरोवरची देवी म्हणून ओळख

Shardiya Navratri 2023 : आज आम्ही तुम्हाला चीनमध्ये असलेल्या शक्तीपीठाची माहिती देणार आहोत.

कोमल दामुद्रे

Shanktipeeth In China :

नवरात्रीला सुरुवात झाली आहे. घरोघरी घटस्थापना होऊन रोज देवीची पूजा केली जाते. तसेच अनेक लोक उपवास करतात. नवरात्री म्हटल्यावर अनेक देवींच्या मदिरांना भाविक भेट देतात. नवरात्रीत मुख्यतः प्रमुख शक्तीपीठांना भेट द्यायची असते. देवीचे आशिर्वाद घ्यायचे असतात. असे म्हणतात.

देवी सतीच्या शरीराचे तुकडे ज्या ठिकाणी पडले आहेत. त्या ठिकाणांना शक्तीपीठ म्हटले जाते. जगभरात एकूण ५१ शक्तीपीठ आहेत. पाकिस्तान, चीन , श्रीलंका या देशांमध्ये देवीची शक्तीपीठे आहे. आज आम्ही तुम्हाला चीनमध्ये असलेल्या शक्तीपीठाची माहिती देणार आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मानसा शक्तीपीठ

चीनव्याप्त (China) तिबेटमध्ये देवीचे एक शक्तीपीठ आहे. कैलास पर्वताच्या मागे दगडी खडकाच्या रुपात हे शक्तीपीठ आहे. या शक्तीपीठाला मानसा शक्तीपीठ (Shaktipeeth) म्हणतात. हे ठिकाण मानसरोवर तलावाच्या मागे वसलेले असते. येथे सती मातेचा उजवा हात पडला होता असे म्हटले जाते. येथे सती मातेला 'दक्षीयणी' आणि भगवान शिव यांना 'अमर' या नावाने ओळखले जाते. हिंदू धर्मात हे एक पवित्र स्थान आहे. या ठिकाणी गेल्यावर इच्छा पूर्ण होतात असे म्हणतात.

2. भाविकांची गर्दी

येथे देवीचे मोठे मंदिर आहे. लोक खडकाला देवी मानून त्याची पूजा करतात. या ठिकाणी सिंधू, सतल, बह्मपुत्रा या नद्या वाहतात. तर मानसरोवरची देवी म्हणून ओळखली जाते. फक्त नवरात्रीत नव्हे तर बारामाही येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. येथील हवामान चांगले असल्याने तेथे दर्शनासाठी लोकांची गर्दी असते.

3. महाराष्ट्रातील शक्तीपीठे

एकूम ५१ शक्तीपीठांमधील साडेतीन शक्तीपीठे ही महाराष्ट्रात स्थित आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या (Kolhapur) महालक्ष्मीला पहिले शक्तीपीठ मानले जाते. माहूरगडच्या रेणूकामातेला दुसरे शक्तीपीठ तर तुळजापूरच्या तुळजाभवानीला तिसरे शक्तीपीठ संबोधले जाते. तर सप्तश्रृंगीगडच्या श्री सप्तश्रृंग देवीला अर्ध शक्तीपीठ मानले जाते. दरवर्षी नवरात्रीत मोठ्या भक्तीभावाने भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

SCROLL FOR NEXT