Navratri Special Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri Special : 51 शक्तिपीठांपैकी 9 शक्तीपीठे परदेशात, पाकिस्तानाचाही यात समावेश

Shraddha Thik

Shaktipeeth :

देवी सतीच्या शरीराचे 51 भाग ज्या ठिकाणी पडले त्यांना शक्तीपीठ म्हणतात. नवरात्रीच्या काळात या शक्तीपीठांवर भाविकांची गर्दी असते. या शक्तीपीठांपैकी 9 शक्तीपीठे परदेशात आहेत. तुम्हालाही या शक्तीपीठांना भेट द्यायची असेल, तर जाणून घ्या, भारताव्यतिरिक्त कोणत्या देशात देवीची शक्तीपीठे आहेत.

नवरात्रीत शक्तीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. देवीच्या मंदिरात (Temple) भाविकांची सतत वर्दळ असते. देवी सतीच्या आत्मदाहानंतर भगवान विष्णू यांनी सुदर्शन चक्राने सतीच्या मृतदेहाचे 51 तुकडे केले. हे तुकडे पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडले, त्या ठिकाणांना शक्तीपीठे अशी आख्यायिकेत सांगितले आहे.

हिंदू धर्मात या स्थानांना खूप महत्त्व (Importance) आहे. पण ही सर्व शक्तीपीठे भारतात नाहीत, 51 शक्तीपीठांपैकी 9 शक्तीपीठे भारताबाहेर स्थापित झाली आहेत. पाहा कोणत्या देशात देवीच्या शक्तीपीठांची स्थापना झाली आहे.

पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये एक शक्तीपीठ स्थापन केले आहे, ज्याला हिंगलाज शक्तीपीठ (Shatipeeth) म्हणतात. येथे सती देवीचे मस्तक पडले होते. हे कराचीपासून 125 किमी अंतरावर पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये आहे. लांब आहे. येथील देवीला कोट्टारी तर भैरवाला भीमलोचन या नावाने ओळखले जाते.

बांगलादेश

बांगलादेशात चार शक्तीपीठे आहेत. सुगंधा शक्तीपीठ, कराटोयाघाट शक्तीपीठ, चट्टल शक्तीपीठ आणि यशोर शक्तीपीठ.

  • सुगंधा शक्तीपीठ

    येथे देवी सतीचे नाक पडले होते. हे बांगलादेशातील बारिसाल जिल्ह्यापासून 20 किमी अंतरावर शिकारपूर येथे आहे. येथे देवीला सुनंदा, देवी तारा या नावानेही ओळखले जाते. येथील भैरवांना त्र्यंबक भैरव म्हणतात.

  • करतोयघाट शक्तीपीठ

    हे बेगडा, भवानीपूर, बांगलादेश येथे आहे. देवीच्या डाव्या पायाचे घोटे इथेच पडली होती. येथे देवीला अपर्णा आणि भगवान शिवाला वामन म्हणून ओळखले जाते.

  • चट्टल शक्तीपीठ

    हे चितगाव, बांगलादेश येथे आहे. देवीचा उजवा हात इथे पडला होता. येथील शक्तीला भवानी आणि भैरवाला चंद्रशेखर म्हणतात.

  • यशोर शक्तीपीठ

    हे बांगलादेशातील जेसोर खुलना नावाच्या ठिकाणी आहे. येथे देवीचा डावा तळहाता पडला होता. येथील शक्तीला यशोरेश्वरी आणि भैरवाला चंद्र म्हणतात. . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिबेट

तिबेटमधील मानसरोवराजवळ मानस शक्तीपीठाची स्थापना आहे. या ठिकाणी देवीचा उजवा तळहाता पडला होता. या शक्तीपीठाच्या देवीला दाक्षायणी आणि भैरवाला अमर म्हणतात.

नेपाळ

नेपाळमध्ये दोन शक्तीपीठे आहेत. गुह्येश्वरी शक्तीपीठ आणि गंडकी शक्तीपीठ.

  • गुह्येश्वरी शक्तीपीठ

    हे शक्तीपीठ काठमांडू येथे आहे. येथे देवीचे दोन्ही गुडघे पडले होते. हे पशुपती मंदिराजवळ आहे. येथील देवीला महामाया आणि भैरवाला कपाल म्हणतात.

  • गंडकी शक्तीपीठ

    हे नेपाळच्या गंडकी नदीजवळ वसलेले आहे. या ठिकाणी देवीची कवटी पडली होती. येथील देवीला गंडकी आणि भैरवाला चक्रपाणी म्हणतात.

श्रीलंका

येथे एक शक्तीपीठ स्थापन केले आहे, जे लंका शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. श्रीलंकेत असलेल्या या शक्तीपीठात देवीला इंद्राक्षी आणि भैरवाला राक्षस म्हणतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT