नवरात्रीचा सण दुर्गा मातेच्या भक्तांसाठी खूप खास आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे. आज नवरात्रीचा दुसरा दिवस. या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. असे मानले जाते की जे भक्त देवीची खऱ्या मनाने पूजा (Pooja) करतात त्यांचे सर्व संकट देवी दूर करते. आजचा दिवस शास्त्रात खूप शुभ मानला जातो.
नवरात्रीचे महत्त्व (Importance) अतिशय धार्मिक आहे. आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे, जो तपश्चर्येची देवी मानल्या जाणार्या ब्रह्मचारिणी मातेला समर्पित आहे. देवी ब्रह्मचारिणीच्या डाव्या हातात कमंडल आणि उजव्या हातात जपमाळ आहे. तसेच तिने पांढरी साडी नेसली आहे. ब्रह्मचारिणी देवीची उपासना केल्याने भक्तांना शक्ती, बुद्धी आणि ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते . माता ब्रह्मचारिणी ही देवी दुर्गेच्या सर्वात शांत आणि सुंदर रूपांपैकी एक आहे.
धर्मग्रंथानुसार, देवी ब्रह्मचारिणीचा जन्म हिमालय राजाची कन्या म्हणून झाला. जिला पार्वती म्हणून ओळखले जाते, त्यानंतर तिने तिच्या प्रेमासठी घर (Home) सोडले आणि भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली.
पहिली एक हजार वर्षे ती फळे आणि फुले खाऊन जगली, त्यानंतर एक हजार वर्षे ती औषधी वनस्पतींवर जगली आणि त्यानंतर एक हजार वर्षे तिने बेलपत्राची फक्त तुटलेली पाने खाल्ली. यानंतर तिने अन्न आणि पाणी सोडले आणि पुढील एक हजार वर्षे जगली. देवी पार्वतीचे समर्पण पाहून सर्व देवांनी आणि सप्तऋषींनी तिला भगवान शिवाशी विवाह करण्याचा आशीर्वाद दिला आणि तिचे नाव अपर्णा ठेवले.
या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
दधाना कर पद्माभ्याम अक्षमाला कमण्डलू।
देवी प्रसीदतु मई ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.