हिंदू पंचांगानुसार, उद्या 16 ऑक्टोबर 2023, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाचा दुसरा दिवस म्हणजेच शारदिय नवरात्रीचा दुसरा दिवस. या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार त्यांची पूजा केल्याने व्यक्तीमध्ये तपस्या, त्याग, नैतिकता आणि संयम यांसारखे गुण वाढतात.
तसेच ब्रह्मचारिणी मातेची आराधना केल्याने आळस, अहंकार, लोभ, असत्य, स्वार्थ, मत्सर या वाईट प्रवृत्ती दूर होतात. देवीचे स्मरण केल्याने बुद्धी आणि संयम वाढतो. चला जाणून घेऊया ब्रह्मचारिणी देवीची पूजा (Puja) कशी करावी आणि महत्त्व काय आहे.
पूजेची पद्धत -
सकाळी स्नान करून घरातील (Home) पूजेच्या ठिकाणी बसा. यानंतर माता आदिशक्ती दुर्गेचे दुसरे रूप माता ब्रह्मचारिणीचे स्मरण करून तिला फुले, अक्षता, चंदन अर्पण करा. आता देवीला साखर (Sugar) किंवा पंचामृत अर्पण करा. 'ओम ऐन नमः' मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच देवीला सुपारी आणि लवंग अर्पण करा. यानंतर मातेची पूजा करून आरती करावी.
माता ब्रह्मचारिणी पूजा मंत्र -
या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
दधाना कपाभ्यामक्षमालाकमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।
माता ब्रह्मचारिणीची आरती -
जय अंबे ब्रह्माचारिणी माता।
जय चतुरानन प्रिय सुख दाता।
ब्रह्मा जी के मन भाती हो।
ज्ञान सभी को सिखलाती हो।
ब्रह्मा मंत्र है जाप तुम्हारा।
जिसको जपे सकल संसारा।
जय गायत्री वेद की माता।
जो मन निस दिन तुम्हें ध्याता।
कमी कोई रहने न पाए।
कोई भी दुख सहने न पाए।
उसकी विरति रहे ठिकाने।
जो तेरी महिमा को जाने।
रुद्राक्ष की माला ले कर।
जपे जो मंत्र श्रद्धा दे कर।
आलस छोड़ करे गुणगाना।
मां तुम उसको सुख पहुंचाना।
ब्रह्माचारिणी तेरो नाम।
पूर्ण करो सब मेरे काम।
भक्त तेरे चरणों का पुजारी।
रखना लाज मेरी महतारी।
ब्रह्मचारिणी देवीला या गोष्टी अर्पण करा -
ब्रह्मचारिणी देवीला कमळ खूप आवडतात. त्यामुळे त्यांना हे फूल अर्पण करावे. तसेच देवीला साखर मिठाई आणि पंचामृत अर्पण करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.