Shani Gochar 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Shani Gochar 2023 : शनिचा कुंभ राशीत प्रवेश ! तब्बल 30 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग, 56 दिवस या राशी होतील मालामाल

Shravanmas Rashifal : ३० वर्षानंतर शनी कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे भगवान शंकराची व शनिदेवाची कृपा मिळेल.

कोमल दामुद्रे

Shani In Kumbh Rashi : सध्या उत्तर भारतात श्रावणमास सुरु झाला आहे. यंदा अधिक मासामुळे श्रावण हा ५९ दिवसांचा असणार आहे. हिंदू पंचागानुसार ग्रहांचे संक्रमण, त्यांचे वक्री होणे व त्यांचा विशिष्ट राशीत-नक्षत्रात प्रवेश होत असतो. त्यामुळे अनेक राशींवर शुभ व अशुभ प्रभाव पडत असतात.

३० वर्षानंतर शनी कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे भगवान शंकराची व शनिदेवाची कृपा मिळविण्यासाठी हा महिना विशेष असेल. ४ जुलैपासून ३१ ऑगस्टपर्यंत धनलाभ होईल. तसेच शनिदेव संपूर्ण श्रावण महिन्यात 4 राशीच्या लोकांना विशेष आशीर्वाद देणार आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी श्रावण महिना शुभ ठरणार आहे.

1. मेष :

मेष राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना शुभ ठरणार आहे. या लोकांना नोकरी (Job)-व्यवसायात यश मिळू शकते. तसेच प्रमोशनही मिळेल. 31 ऑगस्टपर्यंतचा काळ या लोकांसाठी सन्मान आणि प्रगतीचा असेल. अविवाहित लोकांचे विवाह (Marriage) निश्चित होऊ शकतात. रखडलेली कामे पूर्ण होतील.

2. मिथुन:

श्रावण महिन्यात मिथुन राशीच्या लोकांना फायदा होईल. नोकरीत प्रगती होईल. व्यवसाय चांगला चालेल. वैवाहिक जीवनात आनंद येईल. अनेक इच्छा पूर्ण होतील. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात.

3. सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ ठरणार आहे. शनिदेव आणि भगवान शंकरामुळे प्रगतीचे नवे मार्ग खुलतील. पगारात (Salary) वाढ होऊ शकते. जीवनात सुख-सुविधा वाढतील. नवीन काम सुरू करू शकाल. वैवाहिक जीवनातील तणाव दूर होईल.

4. वृश्चिक:

वृश्चिक राशीच्या लोकांवर शनी कृपा करणार आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन नोकरी मिळू शकते. हव्या त्या क्षेत्रात नोकरी मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan: युद्धामुळे कंगाल पाकिस्तानची आर्थिक कोंडी, फेडावं लागणार अब्जावधी डॉलर्सचं कर्ज

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

SCROLL FOR NEXT