Meningitis Symptoms google
लाईफस्टाईल

Meningitis Symptoms : जास्त डोकेदुखी धोकादायक! ही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या

Headache Warning : अचानक होणारी तीव्र डोकेदुखी, ताप, ताठ मान, उलट्या, गोंधळ किंवा बेशुद्धावस्था ही साधी लक्षणे नसून मेनिंजायटीसची सुरुवात असू शकते. वेळेत उपचार न घेतल्यास जीवघेणे ठरू शकते.

Sakshi Sunil Jadhav

डोकेदुखी हा त्रास सगळ्यांना सामान्य वाटतो. काही वेळेस अचानक डोकेदुखी, जास्त प्रकाशामुळे डोळ्यांना खाज सुटणे, डोळ्यांमध्ये जळजळ होणे आणि त्यासोबतच ताप येणे ही साधी लक्षणे नसून ती मेंदूच्या तापाची म्हणजेच मेनिंजायटीसची सुरुवात असू शकतात. हा आजार अत्यंत गंभीर आणि जीवघेणा मानला जातो. त्यावर वेळेत उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. वैद्यकीय भाषेत मेनिंजायटीस म्हणजे मेंदू आणि पाठीच्या कण्याला झाकणाऱ्या पडद्याला मेनिंजेस होणारी सूज. ही सूज प्रामुख्याने बॅक्टेरिया, विषाणू किंवा बुरशीजन्य संसर्गामुळे निर्माण होते.

तज्ज्ञांच्या मते, हा आजार बहुतेकदा नाक, कान किंवा घशातील संसर्गामुळे सुरू होतो आणि हळूहळू मेंदूपर्यंत पसरतो. विशेषत: पाच वर्षांखालील मुलांना, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले रुग्णांना, गर्दीच्या ठिकाणी राहणारे लोक किंवा अलीकडेच कान-डोक्याचा संसर्ग झालेल्यांना या आजाराचा धोका अधिक असतो. रुग्णांमध्ये तीव्र डोकेदुखी, जास्त ताप, ताठ मान, उलट्या, गोंधळ, बेशुद्ध अवस्था तर लहान मुलांमध्ये सतत रडणे आणि सुस्ती ही लक्षणे आढळतात.

मेनिंजायटीसची त्वरित ओळख आणि उपचार आवश्यक असतात. बॅक्टेरियल संसर्गामध्ये अँटीबायोटिक्स दिले जातात तर विषाणूजन्य प्रकरणांमध्ये लक्षणे कमी करण्यासाठी औषधे, विश्रांती आणि रुग्णालयीन उपचार केले जातात. रुग्णाला रुग्णालयात दाखल करून त्याची ऑक्सिजन पातळी, रक्तदाब आणि तापमान नियंत्रणात ठेवले जाते. त्यामुळे वेळेत उपचार करणे हा जीव वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT