Shruti Vilas Kadam
सूर्यनमस्कार हा १२ आसनांचा संच असून तो संपूर्ण शरीराला व्यायाम देतो. रोज १०–१२ सूर्यनमस्कार केल्यास कॅलरी बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
भुजंगासनामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच पाठ मजबूत होते आणि पचनक्रिया सुधारते.
नौकासन करताना पोटावर ताण येतो, ज्यामुळे बेली फॅट कमी करण्यास मदत होते. कोअर मसल्स मजबूत होतात.
त्रिकोणासनामुळे कंबर, मांड्या आणि पोटावरचा अतिरिक्त मेद कमी होण्यास मदत होते. शरीर लवचिक बनते.
सेतूबंधासनामुळे थायरॉईड ग्रंथी उत्तेजित होते आणि मेटाबॉलिझम सुधारतो. त्यामुळे वजन कमी होण्याची प्रक्रिया जलद होते.
कपालभाती नियमित केल्यास पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.
योगासोबत संतुलित आहार आणि नियमितता अत्यंत महत्त्वाची आहे. दररोज किमान ३० मिनिटे योगा केल्यास चांगले परिणाम दिसून येतात.