Women Health Issues Saam Tv
लाईफस्टाईल

Women Health Issues : महिलांना जडतात 'या' 3 प्रकारच्या गंभीर समस्या, वेळीच लक्ष न दिल्यास भोगावे लागतात परिणाम !

महिलांना मध्ये असे काही सामान्य आजार असतात त्याची योग्य ती काळजी न घेतल्यास त्रास वाढून गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

कोमल दामुद्रे

Women Health Issues : घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणारी महिला स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करत असते.पण महिलांना मध्ये असे काही सामान्य आजार असतात त्याची योग्य ती काळजी न घेतल्यास त्रास वाढून गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

मुलीच्या १३ व १४ वयापासून मानसिक पाळीला सुरूवात होते. अशा वेळी शरीरात अनेक घटकांची कमतरता असते.त्यामुळे ती कमतरता पूर्ण करण्यासाठी आहाराकडे आणि आरोग्याकडे लक्ष्य देणे महत्वाचे असते.

महिलांनी गर्भधारणेपासून ते बाळंतपण होईपर्यंत आरोग्याकडे जास्ती लक्ष देणे आवश्यक असते.या दरम्यान महिलांच्या हाडांवर विशेष परिणाम होतो. त्यामुळे त्यांना अनेक आजार होण्याची शक्यता असते जाणून घेऊया त्याबद्दल

1. ब्रेस्ट कॅन्सर

महिलांच्या (Women) शरीरातील महत्वाचा एक भाग म्हणजे स्तन आहे. स्तनाचे काम असते ऊतीपासून दूध निर्माण करायचे. ती लहान केशिकांद्वारे तरंगांशी जोडले गेलेले असते. केशिका/वाहिन्यामध्ये जेव्हा कण जमा होऊन स्तनाच्या ऊतीमध्ये गाठी बनतात तेव्हा ब्रेस्ट कॅन्सर वाढायला लागते.

Breast Cancer

ब्रेस्ट कॅन्सर ची लक्षणे

  • स्तनाच्या आकारात बदल होऊन,स्तन डगमगणे

  • स्तनाच्या आत गाठ

  • स्तनातून रक्त येणे

  • अंडरआर्ममध्ये गाठ

  • स्तनावर सूज येणे

2. ऑस्टिओपोरोसिस

ऑस्टिओपोरोसिस हा हाडांचा आजार आहे. यात बोन डेंसिटी कमी होते परिणामी हाड नाजूक होते त्यामुळे हाड तुटण्याची शक्यता असते. शरीरातील कॅल्शियम कमी झाल्याने हा आजार होतो.ऑस्टिओपोरोसिस आजार टाळण्यााठी कॅल्शियमयुक्त आहार घेणे आवश्यक असते. चहा, कॉफी (Coffee) अशा कॅफीनयुक्त पेयायंचे सेवन टाळा. तुम्हाला धूम्रपान, मद्यपान करण्याची सवय असेल तर ती ताबडतोब बंद करणे गरजेचे आहे.

osteoporosis

महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे

  • साधारण लागले तरी फ्रॅक्चर

  • सतत पाठ दुखीचा त्रास

  • शरीर वाकणे

3. नैराश्य (Depression)

नैराश्याचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो.त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाहीतर पुढे चालून गंभीर समस्यांचा सामना करण्याची वेळ येऊ शकते.

Depression

महिलांमध्ये नैराश्याची लक्षणे

  • लक्ष केंद्रित करण्यात अडचणी

  • आवडत्या गोष्टीत रस कमी होणे

  • भूक न लागणे

  • झोप न लागणे

  • अनियमित मानसिक पाळी

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT