Myopia in children saam tv
लाईफस्टाईल

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Screen time and myopia: मोबाईल, टॅबलेट आणि ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढत आहे. सतत जवळ पाहणे आणि मैदानी खेळाचा अभाव मायोपियाच्या जोखमीशी संबंधित असू शकतो. दूरचे धुसर दिसणे, डोळे चोळणे, डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास डोळ्यांची तपासणी करून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

काही वर्षांपूर्वी मुलांचा बराच वेळ मैदानी खेळ, सायकलिंग, धावणं आणि झाडांवर चढण्यात जायचा. त्यामुळे त्यांची नजर सतत जवळच्या आणि दूरच्या वस्तूंवर जात असे. आता मात्र मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, टीव्ही आणि ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा स्क्रीनसमोरचा वेळ वाढला आहे. याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यावरही दिसू लागला आहे.

नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या बाल नेत्ररोग विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. नीपा ठक्कर यांच्या मते, कमी वयातच मुलांमध्ये मायोपिया म्हणजेच जवळच्या वस्तू स्पष्ट दिसणं, दूरचं धुसर दिसणं ही समस्या वाढताना दिसतंय. यामागे अनुवंशिकतेसोबतच सतत जवळच्या वस्तूंकडे पाहणं आणि मैदानी खेळासाठी कमी मिळणारा वेळ हेही महत्त्वाचं कारण मानलं जातं

संशोधनानुसार, नियमितपणे बाहेर खेळणाऱ्या मुलांना मायोपिया होण्याचा धोका तुलनेने कमी असतो. नैसर्गिक प्रकाश आणि दूरच्या वस्तूंकडे पाहण्याची सवय डोळ्यांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. स्क्रीनचा वापर कसा केला जातो, हे महत्त्वाचं आहे. स्क्रीन डोळ्यांच्या खूप जवळ ठेवणं किंवा सलग अनेक तास वापरण्यामुळे डोळे दुखणं, जळजळ, वारंवार डोळे चोळणं, डोकेदुखी, लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि काही काळ दूरचं धुसर दिसणं अशी लक्षणं जाणवू शकतात.

मायोपिया वाढत गेल्यास केवळ चष्म्याचा नंबर वाढत नाही, तर भविष्यात रेटिनाला इजा, ग्लॉकोमा, कमी वयात मोतीबिंदू आणि मायोपिक मॅक्युलर डिजेनेरेशन यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

मुलं अनेकदा दृष्टी कमी झाल्याची तक्रार करत नाहीत. त्यामुळे टीव्हीच्या अगदी जवळ बसणं, वर्गात पुढे बसण्याची इच्छा, वारंवार डोळे बारीक करून पाहणं, वाचन किंवा मैदानी खेळात रस कमी होणं याकडे पालकांनी लक्ष द्यावं.

डोळ्यांसाठी या सवयी ठेवा

मुलांना शक्य असल्यास दररोज दोन तास बाहेर खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. तसंच 20-20-20 नियम पाळावा. म्हणजेच दर 20 मिनिटांनी किमान 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पाहावं.

स्क्रीन डोळ्यांपासून योग्य अंतरावर ठेवावी आणि तो डोळ्यांच्या पातळीपेक्षा किंचित खाली असावी. सलग स्क्रीन वापरणं टाळून मध्ये ब्रेक घ्यावा. योग्य प्रकाश, बसण्याची योग्य पद्धत आणि मनोरंजनासाठी स्क्रीनचा मर्यादित वापरही महत्त्वाचा आहे.

मुलांच्या डोळ्यांची नियमित तपासणी करून घेणं गरजेचं आहे. मायोपिया वाढत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने विशेष चष्म्याची भिंगं, मायोपिया कंट्रोलसाठी कॉन्टॅक्ट लेन्स किंवा कमी डोसचे अ‍ॅट्रोपिन ड्रॉप्स यांसारखे उपचार उपलब्ध आहेत.

वेळीच तपासणी आणि योग्य सवयी यामुळे मायोपियाची वाढ कमी करण्याची संधी मिळू शकते. तंत्रज्ञानापासून मुलांना दूर ठेवणं शक्य नसलं तरी स्क्रीनसोबत मैदानी खेळ, विश्रांती आणि नियमित डोळ्यांची तपासणी केली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

Bank Account Money After Death: खातेदाराच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशांचे काय होते? जाणून घ्या नियम

Famous Singer : प्रसिद्ध गायक झाला बाबा; घरी आला चिमुकला पाहुणा, ५ महिन्यांपूर्वी बांधली लग्नगाठ

Pitru paksha : पितृपक्षात दुर्दैवी घटना! श्राद्धासाठी नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT