Calcium Deficiency  Saam Tv
लाईफस्टाईल

Calcium Deficiency : कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतात अशा प्रकारचे गंभीर आजार, पाहूयात कॅल्शियमची कमतरता कशी भरून काढावी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Deficiency Of Calcium : कॅल्शियम मानवाच्या संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. कॅल्शियमचे कमतरतेमुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार जडू शकतात. ब्लड प्रेशर पासून ते हृदय रोगांपर्यंत अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणते पदार्थ कॅल्शियम वाढवण्यासाठी खाल्ले पाहिजे.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात हे आजार -

कॅल्शियमच्या कमीमुळे ब्लड प्रेशर, मांसपेशी आणि गुडघ्यांमध्ये जकडन, दातांचे दुखणे, ड्राय स्किन,नख कमकुवत होणे, सारखे समस्या कॅल्शियम (Calcium) कमी असल्याने उद्भवतात. सोबतच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा खतरा वाढू लागतो.

शरीरामधील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या डायटमध्ये दुग्धजन्य पदार्थ (Food) सामील करा. दूध, दही, पनीर आणि भाज्यांचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्राप्त होईल.

ड्रायफ्रूट्स -

जर तुम्हाला कॅल्शियम प्राप्त करण्यासाठी नॉन डेअरी प्रॉडक्टचे सेवन करायचे नसेल तर, तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि नट्सचे सेवन करू शकता. यांना कॅल्शियमचे चांगले स्त्रोत मानले जाते. बादामचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते.

अनेक मेडिकल जर्नल सांगतात की, एक कप बदाममध्ये 385 मिलीग्राम एवढे कॅल्शियम उपलब्ध असते. सोबतच बादाममध्ये मॅग्नेशियम, म्याग्निज आणि विटामिन ई सुद्धा उपलब्ध असते.

हिरव्या पालेभाज्या -

हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध असते. जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. पालक, मेथी, मुळा, दुधी भोपळा, तांदुळाची भाजी, लाल माठ यांसारख्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध असते.

या भाज्यांचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघण्यास मदत होते. सोबतच या भाज्यांचे सेवन केल्याने तुमची हाड मजबूत होतात आणि तुमचे दात देखील मजबूत बनतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

Kalyan Crime : डिलिव्हरी बॉय, पण काम भयंकर, व्हिडिओ बघून सर्वच हैराण; CCTV पाहा

Jalgaon Religious Places : निसर्गाचं सानिध्य अन् भक्तीचा मेळ, जळगावातल्या धार्मिक स्थळांना भेट द्याच!

Bacchu Kadu: 'राज्याचा सातबारा नावावर आहे का?' बच्चू कडूंचा संजय राऊत, रोहित पवारांवर प्रतिहल्ला; २८८ जागा लढवण्याचीही घोषणा!

SCROLL FOR NEXT