Senior Heart Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Senior Heart Health Tips : वयाची ५० शी ओलांडल्यानंतर हृदयाची काळजी कशी घ्याल ?

तुमचे वय वाढत असताना तुमचे हृदय तेवढे वेगाने धडधडत नाही जितके तुम्ही तरुण असताना होते.

कोमल दामुद्रे

Senior Heart Health Tips : हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने एक तरी तरुणाचा मृत्यू होताना दिसत आहे. सध्या बॉलिवूडला देखील प्रचंड विळखा याचा जडला आहे. नुकतेच पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेते महेश बाबू यांचे वडील आणि तेलुगू अभिनेते कृष्णा यांचे मंगळवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले कृष्णा 80 वर्षांचे होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते आणि सोमवारी रात्रीपासून ते व्हेंटिलेटरवर होते. अशा परिस्थितीत हृदयाच्या आरोग्याबाबत (Health) पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

वृद्धापकाळात हृदयाची काळजी

यूएस सीडीसीच्या मते, वयानुसार तुमच्या हृदयाची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे होते. अमेरिकेत दर 36 सेकंदाला हृदयविकाराने एका व्यक्तीचा मृत्यू होतो. 70 नंतर हृदयविकाराचा धोका आणखी वाढतो. हृदय आणि रक्तवाहिन्यांमधील बदल टाळता येत नाहीत.

तुमचे वय वाढत असताना तुमचे हृदय तेवढे वेगाने धडधडत नाही जितके तुम्ही तरुण असताना होते. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा हृदयाचा धोका ५० वर्षे आणि त्याहून अधिक वयात वाढतो. हृदयविकाराचे प्रमुख कारण म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये अनेक वर्षांपासून चरबी जमा होणे.

वाढत्या वयानुसार हृदयाची काळजी कशी घ्याल ?

1. हृदय निरोगी ठेवा

हृदयासह उर्वरित अवयव निरोगी ठेवण्यासाठी हलका व्यायाम करा, परंतु त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. धावणे किंवा जॉगिंगसारखे कठोर व्यायाम न करण्याची काळजी घ्या. त्याऐवजी तुम्ही योगा, श्वासोच्छवासाचे व्यायाम करू शकता. याशिवाय तुम्ही स्लो मूव्हमेंट, स्लो डान्सिंग, स्विमिंग सारखे वर्कआउट्स देखील करू शकता.

2. हृदयाच्या आरोग्याचे निरीक्षण करा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वयाच्या 40 वर्षांनंतर नियमित तपासणी करा. 70 पासून रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या आरोग्यावर दररोज तपासणी करा.

3. पौष्टिक आहार घ्या

सॅच्युरेटेड फॅट, साखर (Sugar) आणि मीठ कमी असलेले पदार्थ निवडा. वयानुसार, तुमचे शरीर मीठ सहन करण्यास कमी सक्षम होते, ज्यामुळे पोट फुगते आणि सूज येते. हंगामी फळे, भाज्या आणि फायबर असलेले पदार्थ खा.

4. वजन नियंत्रणात ठेवणे

वयाच्या 70 नंतर कोणत्याही प्रकारचा आहार चालत नाही, त्यामुळे डॉक्टरांनी भरपूर पोषणयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. वजन राखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी ठोस आहार घेणे महत्त्वाचे आहे.

5. धूम्रपान टाळा

धूम्रपानामुळे तुमच्या फुफ्फुसांना आणि हृदयाला अधिक नुकसान होऊ लागते. वयोमानानुसार आपण शरीराची काळजी घेण्यासाठी आपण धुम्रपान करणे टाळायला हवे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : खामगाव तालुक्यातील रामनगर गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटात तणाव

बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून विवाहित महिलेवर अत्याचार, नंतर चावडीवर बांधलं

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर, 73 वर्षीय ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT