Semaglutide new scientific formula weight loss saam tv
लाईफस्टाईल

Weight Loss: वजन घटवण्यात सेमाग्लुटाइडचा नवा वैज्ञानिक फॉर्म्युला ठरतोय गेमचेंजर

Semaglutide new scientific formula weight loss: जगभरातील कोट्यवधी लोकांना भेडसावणारी लठ्ठपणा आणि जास्त वजन ही समस्या दूर करण्यासाठी विज्ञान जगतात मोठा शोध लागला आहे. सेमाग्लूटाइड आता वजन कमी करण्याच्या उपचारात 'गेम-चेंजर' ठरत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

जर तुमचं जीवनात खूप व्यस्त आणि तणावपूर्ण असाल तर वजन नियंत्रणात ठेवणं अशक्य वाटू शकतं. अनेक लोक वेगवेगळा आहार आणि व्यायाम करून पाहतात. पण वजन कमी होत नाही आणि त्यामुळे निराशा येऊ शकते. हे फक्त इच्छाशक्तीचं प्रकरण नाही. विज्ञान सांगतं की, लठ्ठपणा हा एक जुना वैद्यकीय आजार आहे. शरीराची रचना आणि जीवशास्त्रामुळे वजन कमी करणं आणि ते टिकवून ठेवणं कठीण होतं.

आता एक नवीन वैद्यकीय उपाय उपलब्ध आहे त्याचं नाव आहे सेमाग्लुटाइड. हे औषध शरीरात नैसर्गिकरीत्या काम करणारं GLP-1 नावाचं हार्मोनची नक्कल करतं. हे हार्मोन जेवल्यानंतर मेंदूला सांगतं की, पोट भरलं आहे. लठ्ठ लोकांमध्ये ही प्रक्रिया नीट काम करत नाही. सेमाग्लुटाइड ही सिग्नलिंग पुन्हा सुरू करून भूक कमी करतं आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं.

फायदे

  • वैज्ञानिक अभ्यास दाखवतात की, सेमाग्लुटाइड वजन कमी करण्यात आणि ते टिकवून ठेवण्यात मदत करतं.

  • फक्त 5-10% वजन कमी झालं तरी मधुमेह टाळता येतो, कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि PCOS सारख्या समस्या सुधारतात.

  • 10% पेक्षा जास्त वजन कमी झालं तर हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि सांध्यांवरील ताण कमी होतो.

युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ ओबेसिटी (EASO) आणि अनेक वैद्यकीय तज्ञ सेमाग्लुटाइडची शिफारस करतात. पुण्यातील नोबल हॉस्पिटलच्या डॉ. रीमा काशिवा सांगतात की, अनेक रुग्ण स्वतःला दोष देतात कारण त्यांचं वजन कमी होत नाही. पण खरं म्हणजे शरीरच वजन परत वाढवण्याचा प्रयत्न करतं. सेमाग्लुटाइडसारखे उपचार शरीराच्या जैविक अडथळ्यांवर काम करून वजन कमी करणं सोपं करतात.

त्या पुढे म्हणतात, “जेव्हा वजन कमी होतं, तेव्हा रुग्णांना केवळ चाचण्यांचे निकाल सुधारलेले दिसत नाहीत, तर त्यांना ऊर्जा वाढल्यासारखं वाटतं, सांधेदुखी कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो.”

हजारो लोकांवर सेमाग्लुटाइडचा अभ्यास झाला आहे. दीर्घकाळ वजन नियंत्रणासाठी हे सुरक्षित आणि प्रभावी मानलं जातं. सामान्य दुष्परिणाम म्हणजे मळमळ, अतिसार किंवा बद्धकोष्ठता. पण हे बहुतेक वेळा सौम्य असतात आणि शरीर औषधाशी जुळवून घेतल्यावर कमी होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breast Cancer Treatment: ब्रेस्ट कॅन्सरचा महिलांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? उपचारानंतरही जाणवतात या समस्या

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली कुटुंबीयांची भेट

World Unique Places : कुठे गुलाबी तलाव, तर कुठे आरशासारखे वाळवंट; जगातील 'ही' ७ अनोखी ठिकाणे पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Best time to fill CNG: सकाळी की संध्याकाळी? कारमध्ये CNG भरण्याची कोणती आहे बेस्ट वेळ?

Banana-Blood Pressure : रोज केळी खाल्ल्यानं खरंच हाय ब्लड प्रेशर होतं कंट्रोल? 'या' चुका टाळा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT