Cloudy Urine Causes saam tv
लाईफस्टाईल

Cloudy Urine Causes : सकाळी लघवीमध्ये फेस दिसला तर सावध व्हा; शरीरातील २ अवयव निकामी होण्याचे संकेत

Cloudy Urine Causes: तुम्ही निरोगी आहात की नाही हे तुमच्या लघवीच्या माध्यमातून समजून शकतं, याची तुम्हाला कल्पना आहे का? शरीरात कोणत्याही प्रकारचा त्रास उद्भवला की तुमच्या लघवीचा रंग बदलतो. यावेळी लघवीला उग्र वास येतो किंवा लघवीमध्ये फेस येऊ लागतो.

Surabhi Jagdish

आपल्या आरोग्यामध्ये सतत काही ना काही बदल होत असतात. काही कारणांमुळे आपलं आरोग्य बिघडू शकतं. मात्र ज्यावेळी आपण आजारी पडू लागतो, त्यावेळी आपल्या शरीरात काही ना काही बदल दिसून येतात. तुम्ही निरोगी आहात की नाही हे तुमच्या लघवीच्या माध्यमातून समजून शकतं, याची तुम्हाला कल्पना आहे का?

शरीरात कोणत्याही प्रकारचा त्रास उद्भवला की तुमच्या लघवीचा रंग बदलतो. यावेळी लघवीला उग्र वास येतो किंवा लघवीमध्ये फेस येऊ लागतो. सामान्यतः अशा समस्या किडनीच्या आरोग्याशी संबंधित असू शकतात. शरीरातील अवयव आजारी पडले किंवा त्यांच्यासंबंधी काही समस्या निर्माण झाल्या तर लघवीतून तुम्हाला त्याचे संकेत मिळू शकतात. हे संकेत नेमके काय आहेत ते पाहूयात.

लघवीला फेस येणं

लघवीतील फेस ही अशीच एक समस्या आहे जी शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांशी संबंधित समस्यांचं लक्षण मानलं जातं. जर तुम्हाला सकाळी लघवीमध्ये फेस दिसला तर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे प्रोटीन्युरियाचं लक्षण देखील असू शकते. प्रोटीन्युरिया हा आजार किडनी आणि हृदय नीट काम न करण्याशी संबंधित समस्या आहे.

किडनी खराब झाल्यानंतर लघवीमध्ये दिसू शकतो फेस

रक्त आणि शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ त्याचप्रमाण कचरा शरीरातून लघवीद्वारे काढून टाकला जातो. ज्यावेळी तुमची किडनी नीट काम करत नाही, तेव्हा लघवीसोबत प्रोटीन देखील बाहेर पडू लागतात. दरम्यान ही एक गंभीर समस्या मानली असून मूत्रपिंडाच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाल्यावर ही परिस्थिती निर्माण होऊ शकते.

हृदयाच्या आजारांबाबतचा संकेत

लघवीमध्ये फेस निर्माण होणं हे तुमच्या हृदयाचं आरोग्य बिघडल्याचं एक कारण असू शकतं. यापूर्वी केलेल्या संशोधनातून असं समोर आलं आहे की, ज्यावेळी तुमचं हृदय योग्यरित्या काम करत नाही तेव्हा लघवीशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. अशावेळी काही प्रकरणांमध्ये असं दिसून आलं आहे की, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही काळ लघवीमध्ये फेस तयार झाल्याचं दिसून आलं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT