New Blood Group Found saam tv
लाईफस्टाईल

Blood Group: वैज्ञानिकांनी शोधून काढला नवा ब्लड ग्रुप; 50 वर्षांनंतर अखेर रहस्य उलगडलं

New Blood Group Found: जवळपास सर्वांना आपला रक्तगट माहिती असतो. यावेळी समाजामध्ये रक्तदान हे महादान मानलं जातं. अशातच आता तज्ज्ञांनी नवा ब्लड ग्रुप शोधून काढला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

रक्तदान हे महादान मानलं जातं. एखाद्या व्यक्तीला कधी रक्ताची गरज भासू शकते, हे आपण सांगू शकत नाही. आजारी व्यक्तींना रक्ताची गरज भासू शकते. यासाठी समाजात सातत्याने रक्त दानाला प्रोत्साहन दिलं जातंय. अशातच आता संशोधकांनी एक मोठी गोष्टीचा शोध लावला आहे. यावेळी तज्ज्ञांनी नवा ब्लड ग्रुप शोधून काढला आहे.

५० वर्षांपूर्वीचं रहस्य अखेर उलगडलं

नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, वैज्ञानिकांनी एका नव्या ब्लड ग्रुपचा शोध लावला आहे. या ब्लड ग्रुपला MAL असं नाव देण्यात आलं आहे. या ब्लड ग्रुपच्या शोधानंतर असा दावा करण्यात येतोय की, यामुळे ५० वर्षांपूर्वीचं रहस्य उलगडलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे रहस्य AnWj रक्तगटाच्या एंटीजनशी जोडलं होतं. AnWj चा शोध 1972 मध्ये लागला होता, परंतु त्याच्या निर्मितीचे कारण आजपर्यंत कळू शकलेलं नव्हतं. ज्या व्यक्तींला ब्लड ग्रुप खूर दुर्मिळ असतो त्यांच्यासाठी हे संधोशन आशेचा किरण असू शकतं.

दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी ठरणार लाभदायक

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दुर्मिळ रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे AnWj एंटीजन होतो. संशोधकांनी आता जेनेटिक टेस्ट केली आहे, ज्या माध्यमातून रुग्णांची ओळख पटवून अधिक चांगले उपचार करता येऊ शकतात.

जगभरातील सुमारे 400 रुग्णांना NHS ब्लड ट्रान्सप्लांट (NHSBT) ने मदत होते. हे संशोधन अतिशय फायदेशीर ठरतंय. संशोधकांच्या या नव्या संशोधनामुळे रक्त चढवण्यासाठी येणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात. लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे प्रोटीन ब्लड ग्रुप ठरवतात. या प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे रक्तातील अनेक गंभीर समस्या रूग्णाच्या मागे लागू शकतात.

AnWj एंटीजन असणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरु

AnWj एंटीजन हा एक खास प्रकारचा एंटीबॉडी असून त्याला परदेशी एंटीबॉडी म्हटलं जातं. जर शरीरामध्ये हे एंटीबॉडी कमी असेल तर व्यक्तीला आजाराशी लढा देणं कठीण होतं. नवीन संशोधनामुळे या अँटीबॉडी असलेल्या रुग्णांची ओळख देखील शक्य होणार आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT