Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : वेळीच नाही बोलणे शिकून घ्या; आयुष्यभर आनंदी रहाल

Saying No Without Feeling Guilty : आपल्याला न जमणाऱ्या गोष्टींसाठी देखील आपण बऱ्याचदा हो म्हणतो. तुमचा स्वाभिमान दुखावला जाईल अशी कामे करण्यास कोणी सांगितल्यास त्यांना वेळीच नाही म्हणा.

Ruchika Jadhav

रोजच्या जीवनात जगत असताना आपल्याबरोबर अशा अनेक गोष्टी घडतात ज्याने आपण दु:खी होतो. दु:खाच्या कारणासाठी आपण नेहमी स्वत:ला आणि दुसऱ्यांना दोष देत असतो. अनेकवेळा आपल्या माणसांची मने दुखावली जाऊ नयेत यासाठी आपण त्यांचे सर्व बोलणे ऐकून घेतो. मात्र असे केल्याने आपण आपल्याच अडचणी वाढवत असतो.

आपल्याला न जमणाऱ्या गोष्टींसाठी देखील आपण बऱ्याचदा हो म्हणतो. मात्र प्रत्यक्षात त्या गोष्टी किंवा ते काम करताना आपल्या नाकी नऊ येतात. काम निट न झाल्याने पुन्हा आपण दु:खी होतो. त्यामुळे वेळीच एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणता आले पाहिजे.

स्वाभिमान दुखावला गेल्यावर नाही म्हणा

अनेकवेळा कुटुंबियांमध्ये काही कारणावरून समज गैरसमज होत असतात. अशावेळी आपण पडती बाजू घेऊन समोरच्या व्यक्तीला सॉरी म्हणतो. आपली चूक नसताना देखील नाते तुटूनये यासाठी सॉरी बोलणे चुकीचे आहे. तसेच तुमचा स्वाभिमान दुखावला जाईल अशी कामे करण्यास कोणी सांगितल्यास त्यांना वेळीच नाही म्हणा.

स्ट्रेस वाढवणारी कामे

आपलाला झेपतील तेव्हढीच कामे करा. सर्वांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात अनेक व्यक्ती आपल्याला जड जाणाऱ्या कामांसाठी देखील होकार देतात. ही कामे पूर्ण न केल्यास आपल्याला समजून न घेता समोरच्या व्यक्ती आपल्या चूका काढत असतात. त्यामुळे ज्या कामांमुळे तुमचा ताण वाढेल अशी कामे करण्यासाठी आधीच नाही म्हणा.

धमकी दिल्यास नाही म्हणा

अनेकदा आपल्या आजुबाजूचे मित्र परिवार किंवा नातेवाईक आपल्याकडून काही कामे करून घेतात. जेव्हा आपण त्यांना नकार देतो तेव्हा मला नाही ऐकण्याची सवय नाही. तुला हे काम करावेच लागेल अन्यथा मी तुला त्रास देईल, अशा शब्दांत धमकवतात. तुमच्याकडून देखील कोणी अशा प्रकारे काम करून घेत असेल तर त्या व्यक्तीस वेळीच नाही म्हणा. तसेच त्याच्या विरोधात आवाज उठवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, मेट्रोच्या डबल डेकर व्हायाडक्टची गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Ambajogai News : अंबाजोगाईच्या तरुणाने बनवली 'सायबर बंधू' वेबसाइट; गैरवापराला बसणार आळा

Oldest fort in India: भारतातील सर्वात जुना किल्ला कोणता आहे?

Maharashtra Live News Update: मनोज जरांगेंचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले

Mukesh Ambani : अंबानींच्या घरी रोज बनवल्या जातात तब्बल ४००० चपात्या! वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT