Chew Gum After Meals Acidity saam tv
लाईफस्टाईल

Chew Gum After Meals Acidity: रोजच्या ऍसिडिटीला करा रामराम! फक्त जेवणानंतर च्युइंग गम खाण्याची सवय लावा

Natural Remedy for Acidity: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीत ऍसिडिटी किंवा छातीत जळजळ होणं ही एक सामान्य समस्या बनलीये. चुकीच्या खाण्याच्या सवयी, अनियमित वेळापत्रक आणि तणावामुळे अनेकांना दररोज या त्रासाला सामोरं जावं लागतं.

Surabhi Jayashree Jagdish

अनेकदा जेवणानंतर लोकांना तीव्र अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. पोटात आणि छातीत जळजळ होणं, आंबट ढेकर येणं आणि अस्वस्थता जाणवणं या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी बहुतेक लोक एंटासिड गोळी किंवा सिरप घेण्याचा पर्याय निवडतात, कारण हे अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी मदत करतात.

पण तुम्हाला माहिती आहे का, की जेवणानंतर च्युइंग गम खाल्ल्यानेही अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळू शकतो?

च्युइंग गम आणि अ‍ॅसिडिटी यांचा संबंध

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जेवणानंतर च्युइंग गम खाल्ल्याने तोंडात अधिक प्रमाणात लाळ तयार होते. ही लाळ अन्ननलिकेत (इसोफॅगस) जाऊन एक सुरक्षेचा थर निर्माण करते, जो पोटातील अ‍ॅसिडपासून संरक्षण करतो. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटातील अ‍ॅसिड हळूहळू बाहेर टाकलं जातं. ज्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

शुगर-फ्री गम वापरणं का गरजेचं आहे?

हे लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे की शुगर-फ्री च्युइंग गमचाच वापर करावा. कारण साखर असलेलं च्युइंग गम काही परिस्थितींमध्ये अ‍ॅसिडिटी वाढवू शकतो.

  • च्युइंग गमचे इतर फायदे

  • च्युइंग गम चघळल्याने एकाग्रता वाढते

  • स्मरणशक्ती सुधारते

  • तोंडातील लाळेचं प्रमाण वाढतं, जे पचनासाठी फायदेशीर ठरू शकतं

अ‍ॅसिड रिफ्लक्ससाठी पेपरमिंटचा उपयोग फायदेशीर?

अ‍ॅसिड रिफ्लक्सच्या त्रासासाठी पेपरमिंट उपयोगी ठरू शकतो. कारण ते लोअर इसोफॅजियल स्फिंक्टरला आराम देतो, ज्यामुळे अ‍ॅसिड वर येण्याची शक्यता कमी होते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chipi Airport : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईहून सिंधुदुर्ग अवघ्या १ तासात, १५ ऑगस्टपासून चिपी-नवी मुंबई विमानसेवा सुरू

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर विरोधात ढाणकी शहर कडकडीत बंद

किडनी स्टोनच्या रुग्णांनी काय खावे आणि काय काय खाऊ नये?|Kidney Stone Diet Tips

Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलबाबत महत्वाची अपडेट, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Kaju Katli Recipe: खास कार्यक्रम किंवा सणासुदीसाठी घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट काजू कतली; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT