Sarva Pitru Amavasya 2025 Saam Tv
लाईफस्टाईल

Sarva Pitru Amavasya 2025: सर्व पितृ अमावस्येला या ४ ठिकाणी लावा दिवा, पैशांची होईल भरभराट

Pitru Paksha Rituals: सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असून या दिवशी दिवे लावण्याचे खास महत्व आहे.

Manasvi Choudhary

पितृपक्षाचा शेवटचा दिवस २१ सप्टेंबर २०२५ रोजी आहे. या दिवशी सर्व पितृ अमावस्या साजरी केली जाते. हा दिवस श्राद्धासाठी सर्वोत्तम मानला जातो. कारण या दिवशी पूर्वजांना नैवेद्य अर्पण केले जाते.

अमावस्येच्या दिवशी पूर्वज आणि देव दोघांचेही आशीर्वाद मिळतात. धार्मिक विधी म्हणून या दिवशी दिवे लावतात. या दिवशी दिवे लावल्याने घरात लक्ष्मी येते आणि सुख- समृद्धीसाठी पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. सर्व पितृ अमावस्येला कुठे दिवे लावावे हे जाणून घ्या.

सर्व पितृ अमावस्येला पूर्वजांचे ध्यान केल्यानंतर संध्याकाळी, दक्षिण दिशेल तोंड करून तलावाच्या काठावर चारही बाजूला मोहरीचा दिवा लावा आणि पाण्यात सोडा. असं मानलं जातं की सूर्यास्तानंतर दिवा लावल्याने आयुष्यात प्रगती आणि आनंद दरवळतो.

काही अडचणीमुळे तुम्ही पूर्वजांचे श्राद्ध केले नसेल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा आणि "ओम पितृगणाय विद्महे जगत् धारिणी धीमहि। तन्नो पितृ प्रचोदयात्" हा मंत्र जप करा.

सर्व पितृ अमावस्येला देवी लक्ष्मीला प्रसन्न कऱण्यासाठी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. मुख्य दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूला तुपाचा दिवा आणि उजव्या बाजूला तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. यामुळे सकारात्मकता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT