"सरकुला खेळ!" डोंगर भागात खेळला जाणारा आदिवासी मुलांचा अनोखा खेळ...
"सरकुला खेळ!" डोंगर भागात खेळला जाणारा आदिवासी मुलांचा अनोखा खेळ... राजेश भोस्तेकर
लाईफस्टाईल

"सरकुला खेळ!" डोंगर भागात खेळला जाणारा आदिवासी मुलांचा अनोखा खेळ...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: बर्फाळ प्रदेशात पर्यटनास गेल्यावर बर्फात स्नो स्केटींग खेळण्याचा आनंद पर्यटक घेत असतात. स्नो स्केटिंग हे सर्वांना ज्ञात आहे पण रायगडात डोंगर उतारावरील गवतावर खेळला जाणारा सरकुला खेळ तुम्हाला माहीत आहे का. सरकुला म्हणजे सरकणे, आदिवासी भाषेत डोंगर उतारावर सरकणे खेळाला सरकुला म्हणतात. पावसाळा संपल्यानंतर हिवाळा आणि उन्हाळा सुरू झाला की डोंगर भागात राहणारी आदिवासी मुले हा खेळ खेळतात. स्नो स्केटींगचा आनंद ही आदिवासी मुले सरकुला खेळ खेळून लुटत असतात. निसर्गाच्या सानिध्यात हा खेळ खेळताना आदिवासी मुलाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळतो. ("Sarkula game!" A unique game for tribal children played in the mountains)

रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे आतोणे हे गाव डोंगर भागात आहे. आदिवासी कुटूंब या भागात राहत आहेत. आदिवासी मुलांना शहरी भागासारखी बगीचे, इतर मुलांसारखी अत्याधुनिक खेळणे खेळण्यास मिळत नाहीत. अशावेळी आदिवासी मुले ही निसर्गाच्या सानिध्यात राहून स्वतःचे खेळ तयार करतात. असाच डोंगर उतारावरून गवतावर सरकुल्या म्हणजे सरकणे हा खेळ तयार केला. एका लाकडी फळीवर एक मुलगा बसून डोंगर उतारावरून सरकत येतो असा हा खेळ आहे. स्नो स्केटिंग पेक्षाही हा आदिवासी मुलांचा सरकुल्या खेळ हा मजेशीर असला तरी काळजी घेऊन ही मुले खेळत असतात.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Loksabha News: सांगलीचा 'भावी खासदार' कोण? बुलेट, युनिकॉर्नची पैज आली अंगलट; दोघांवर गुन्हा दाखल

ATM Crime : चोरट्यांनी एटीएम मशीनच लांबविली; चोरट्यांनी अगोदर फोडला सीसीटीव्ही

Health Tips: मसाल्यामधील धणे जीरे खाण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे

Raw Banana Benefits: हिरवीगार कच्ची केळी खाण्याचे फायदे माहित आहेत का?

Today's Marathi News Live: शरद पवार, उद्धव ठाकरेंकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही, रावसाहेब दानवेंचं विधान

SCROLL FOR NEXT