Sankasht Chaturthi (Jan 2024) Saam tv
लाईफस्टाईल

Sankasht Chaturthi (Jan 2024): आज वर्षातली पहिली संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय कधी? पूजा कशी कराल? जाणून घ्या

Sankashti Chaturthi 2024 In January : संकष्टी चतुर्थी हा हिंदू पंचागानुसार महत्त्वाचा व्रत ही चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. यंदा ही संकष्टी चतुर्थी जानेवारी महिन्याच्या २९ तारखेला आली आहे.

कोमल दामुद्रे

January Sankashti Chaturthi Date:

संकष्टी चतुर्थी हा हिंदू पंचागानुसार महत्त्वाचा व्रत ही चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. यंदा ही संकष्टी चतुर्थी जानेवारी महिन्याच्या २९ तारखेला आली आहे.

हिंदू धर्मात बुद्धी आणि ज्ञानाची देवता गणपतीला विशेष महत्त्व आहे. गणपतीला प्रत्येक कार्यात पहिला मान दिला जातो. प्रत्येक महिन्यात विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीची (Sankashti Chaturthi) तिथी, पूजा आणि पद्धत

1. संकष्ट चतुर्थी तिथी

पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथीला यंदा संकष्टी चतुर्थी आली. पंचागानुसार २९ जानेवारी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी सुरु होईल तर ३० जानेवारीला ८.५४ वाजता समाप्त होईल. परंतु, चंद्रोदय ९.२६ वाजता होणार आहे. आजची संकष्ट चतुर्थी ही लंबोदर संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाईल.

2. संकष्टी चतुर्थी 2024 मुहूर्त

  • संकष्ट चतुर्थी २९ जानेवारी २०२४ सोमवार

  • तिथी २९ जानेवारी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी

  • समाप्ती ३० जानेवारी सकाळी ०८ वाजून ५५ मिनिटांनी

  • चंद्रोदय रात्री ०९. २६ मिनिटांनी

3. पूजा कशी कराल?

  • या दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर जागरण करुन गणपती बाप्पाचे ध्यान करा.

  • मंदिराची स्वच्छता करा आणि नंतर श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करा.

  • त्यानंतर पंचामृत, अक्षता, सिंदूर, पान अर्पण करा

  • दीप प्रज्वलित करुन व्रत आणि आरती करा

  • तसेच पूजा करताना गणेश (Ganpati) मंत्राचा जप करा.

  • गणपतीला लाडू अर्पण करा. तसेच श्रीगणेशाच्या मंत्राचा जप करा. जर तुम्ही उपवास करत असाल तर तामसिक अन्नपदार्थाचे (Food) सेवन करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT