Monsoon Special SAAM TV
लाईफस्टाईल

Monsoon Special : रिमझिम पावसाच्या सरी अन् थंडगार वारा, 'सांगली' तील निसर्गसौंदर्य खुणावते पर्यटकांना

Sangli Travel : पावसाळ्यात महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा फिरून कंटाळा आला असेल तर, सांगलीतील निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या पर्यटन स्थळांना आवर्जून भेट द्या आणि पावसाचा आनंद घ्या.

Shreya Maskar

पावसाळ्यात (Monsoon ) मुलांना फिरायला कुठे घेऊन जायचे? असा प्रश्न पडला असेल तर, सांगली हे बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही मुलांसोबत येथे वीकेंड प्लान करू शकता. सांगली (Sangli) ही पावसाळ्यात हिरव्या निसर्गाने बहरून येते. इथे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. तुम्ही येथे देवदर्शनसोबत, हायकिंग, ट्रेकिंगचा देखील आनंद घेऊ शकता.

दंडोबा हिल्स फॉरेस्ट रिझर्व्ह

पावसाळ्यात दंडोबा हिल्स फॉरेस्ट रिझर्व्ह हा प्रवास आवर्जून करावा. या ठिकाणी तुम्हाला वनसंपदा पाहायला मिळते. येथे सर्वात लोकप्रिय शिवमंदिर आहे. हे ठिकाण हायकिंगसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथे अनेक जलक्रिडा देखील केल्या जातात. पावसाळ्यात आपल्या मित्रमंडळींसोबत येथे फिरण्याचा नक्की प्लान करा.

रामलिंग बेट

रामलिंग बेट हे सांगलीतील प्रसिद्ध ठिकाण आहे. वाळवा तालुक्यात रामलिंग बेट आहे. बोरगाव येथील कृष्णा नदीच्या पात्रात रामलिंग बेट तयार झालं आहे. नदीच्या उजव्या बाजूला रामलिंग पुरातन मंदिर आहे. हा परिसर मनाला शांती देऊन जातो. येथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

सागरेश्वर अभयारण्य

सांगली येथील पलूस आणि कडेगाव तालुक्याच्या सीमेवर सागरेश्वर अभयारण्य वसलेले आहे. हे ठिकाण विविध जातीच्या हरणांसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण प्राणी आणि पक्षासाठी ओळखले जाते. याठिकाणी सागरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. येथील देवळांची बांधणी हेमांडपंथी आहे.

हरिपूर

सांगलीतील हरिपूर नद्यांच्या संगमासाठी प्रसिद्ध आहे. येथे कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम होतो. येथे संगमेश्वर हे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. येथील लोक या मंदिराला खूप मानतात. नद्यांच्या संगमाचे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात. पावसाळ्यात हरिपूरला स्वर्गानुभव घेता येतो, एवढे सुंदर दृश्य येथे पाहायला मिळते.

चांदोली अभयारण्य

सांगलीतील शिराळा तालुक्यात चांदोली अभयारण्य आपल्याला पाहायला मिळते. लहान मुलांसाठी पिकनिकचे हे उत्तम स्पॉट आहे. या ठिकाणी अनेक वन्यप्राणी आढळतात. तुम्ही येथे कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत ड्रग्जविरोधात मोठी कारवाई; साकीनाक्यातून पेडलरच्या मुसक्या आवळल्या

पाकिस्तानला झटका; होर्मुझमध्ये अमेरिकेनं पाकला दाखवली जागा, नेमकं काय घडलं? video

Maharashtra News Live Update : विदर्भासह महाराष्टात सूर्य कोपला, उष्णतेचा इशारा

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT