Kitchen tips and tricks in Marathi, salt benefits in Marathi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Kitchen Hacks : घरगुती समस्यांवर असे उपयुक्त ठरेल मीठ !

घरच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरेल मीठ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या सर्वांच्या आहारात मीठाचे सेवन नियमित प्रमाणात केले जाते. पण सर्वसाधारणपणे मीठाचा वापर आपण कशाप्रकारे करतो. यावर अवलंबून असते. अनेकांना हे माहित नसेल की, मीठाचा उपयोग फक्त खाण्यासाठीच नाही तर इतर अतिरिक्त वापरातही होतो. (Kitchen tips and tricks in Marathi)

हे देखील पहा -

मीठाचा वापर अशाप्रकारे करा.

१. कपडे आणि कार्पेटवरील डाग काढण्यासाठी -

कपड्यांवर किंवा कार्पेटवर पडले असतील तर डाग पडलेल्या ठिकाणी पांढरी वाइन टाकून डाग हलका करा नंतर, ओल्या कपड्याने पुसून त्यावर मीठ टाकून १० मिनिटे तसेच थांबा. कार्पेट असेल तर व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ (Clean) करा आणि कापड असल्यास पाण्याने (Water) धुवा.

२. कॉफी कमी कडू होण्यासाठी-

कॉफीची अधिक गोड किंवा काळी कॉफी खूप कडू वाटत असल्यास तिला कमी कडू करण्यासाठी आपण त्यात थोडे मीठ घालू शकतो. हे कॉफीचा (Coffee) कडूपणा नाहीसा करेल.

३. फ्रीज साफ करण्यासाठी -

फ्रीज साफ करण्यासाठी आपण कोमट पाण्यात मीठ घालून त्यात कापड बुडवून फ्रीज पुसा. फ्रीजचा दुर्गंध येत असल्यास नाहीसा होईल.

४. चॉपिंग बोर्ड -

प्लॅस्टिक आणि लाकडी चॉपिंग बोर्डवर अनेकदा जंतू असतात. अशावेळी चॉपिंग बोर्ड साफ करताना त्यावर ब्लीच आणि मीठ घालून ते स्वच्छ करून त्याला कोमट पाण्याने धुवा. जर आपल्या घरात लाकडी चॉपिंग बोर्ड असेल तर मीठ आणि लिंबूने आपण स्वच्छ करू शकतो.

५. लाकडावरील पाण्याचे डाग काढण्यासाठी -

लाकडावरील पाण्याचे डाग काढून टाकण्यासाठीही मीठाचा वापरता करता येतो. पाण्यात मीठाची पेस्ट तयार करुन ती पेस्ट मऊ कापडावर लावून आपण लाकूड पुसू शकतो.

६. कॅनव्हास किंवा कापडी शूजमधून वास काढण्यासाठी -

उन्हाळ्यात बुटांचा वास येणे अगदी सामान्य गोष्ट आहे. कॅनव्हास किंवा कापडी शूज असतील तर घामाचा वास नक्कीच येतो. तो कमी करण्यासाठी आपण शूजमध्ये थोडे मीठ घालू शकतो. त्यानंतर आपण त्यांला ओल्या कपड्याने पुसा किंवा धुवा.

अशाप्रकारे आपण आहारातील मीठाचा घरातील इतर गोष्टींसाठी वापर करु शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT