Flight Travel Safety Tips Saam TV
लाईफस्टाईल

Flight Travel Safety Tips : आकाशात उंच उडणाऱ्या विमानात अचानक तब्येत बिघडली तर काय कराल?

Safety Tips in Flight Travel : उपस्थित सर्व प्रवाशांना श्वास कोंडण्याचा त्रास सुरू झाला, जीव गुदमरू लागला. यामध्ये तीन महिलांना जास्त त्रास झाला. त्यातील एक महिला तर थेट बेशुद्ध पडली होती.

Ruchika Jadhav

गेल्या गुरुवारी दिल्लीहून वाराणसी येथे जाणाऱ्या एका इंडिगो फ्लाइटमध्ये मोठा गोंधळ झाला होता. या विमानातील एसी अचानक बंद पडला. असे झाल्याने येथील उपस्थित सर्व प्रवाशांना श्वास कोंडण्याचा त्रास सुरू झाला, जीव गुदमरू लागला. यामध्ये तीन महिलांना जास्त त्रास झाला. त्यातील एक महिला तर थेट बेशुद्ध पडली होती.

अशीच आणखी एक घटना १५ ऑगस्ट रोजी देखील घडली होती. वाराणसीहून विमान मुंबईकडे येत होतं. यावेळी अचानक एका व्यक्तीची तब्येत बिघडली आणि तो खाली पडून बेशुद्ध झाला. या व्यक्तीसाठी एमर्जंसी लँडीग करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्याला तपासले तेव्हा मृत घोषित केले.

आपल्यावर कधी कोणता प्रसंग उद्भवेल याचा काही नेम नाही. अडचणी आपल्या आयुष्यात केव्हावी एन्ट्री घेतात. अशावेळी आपल्याला स्वत:चा जीव वाचवणे हे सर्वात महत्वाचं असतं. रस्त्यावर काही झाल्यास आपण लगेच धावपळ करू शकतो. मात्र विमानात असताना उंच हवेच तातडीने उपचार कसे मिळवायचे हे कुणालाही समजत नाही. त्यामुळे आज याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

विमानात अचानक तब्येत बिघडल्यावर काय करावे?

जनरल फिजिशियन डॉ. उर्वी महेश्वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात कोणतीही अपातकालीन परिस्थिती आल्यास त्यापासून स्वत:चा बचाव कसा करायचा यासाठी विमान हवेत उड्डाण घेण्याआधी एक फ्लाइट अटेंडेंट सेफ्टी बद्दल माहिती देतात. या टिप्स दोन ते सहा मिनिटे दिल्या जातात. तसेच प्रवाशांना त्यांच्या सीटवर एक सिक्युरीटी मॅन्युअल पेपर सुद्धा मिळतो. यामध्ये देखील सेफ्टीशी संबंधित अनेक गोष्टींची नोंद असते.

विमान खाली उतरताना म्हणजे लँडिंग होताना सिट बेल्ट लावून घ्या.

विमानात एमर्जंसी असेल तर विमानात अगदी मधोमध एक पट्टी असते त्या पट्टीकडे लक्ष द्या. या पट्टीच्या सहाय्याने पुढे जात राहा. येथून तुम्ही थेट एमर्जंसी गेट जवळ पोहचाल.

एमर्जंसी विमाना खाली उतरताना ब्रेस पोजमध्ये बसलं पाहिजे. म्हणजे खाली बसताना डोकं आणि पाय मोकळे न सोडता हातांना पोटावर घट्ट धरून ठेवले पाहिजेत.

गरज असेल तितकेच पाणी प्या. मद्यपान करू नका.

लुज आणि कंफर्टेबल वाटेल असेच कपडे परिधान करा.

फोन फ्लाइट मोडवर ठेवा किंवा मग बंद करा. तब्येत अचानक बिघडत असेल तर जवळ फर्स्ट एड किट ठेवा. तब्येत बिघडल्यावर फ्लाइट अटेंडेटशी संपर्क साधा.

प्रत्येक विमानात ऑक्सिजन टँक आणि नेब्युलाइजर नीडल्स, स्ट्रेचर या गोष्टी असतात, तब्येत बिघडताच तुम्हाला याचा उपयोग होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

SCROLL FOR NEXT