Royal Enfield classic 650 Saam tv
लाईफस्टाईल

Royal Enfield classic 650 : लवकरच लॉन्च होणार रॉयल एनफील्ड Classic 650 बाईक; जाणून घ्या किमत व फीचर्स

येत्या काळात कंपनी 650 सीसी सेगमेंटमध्ये आणखीन बाईक लॉन्च करू शकते

कोमल दामुद्रे

Royal Enfield classic 650 : रॉयल एनफिल्ड ने गेल्या काही दिवसांत स्वतःची तिसरी 650 सिसी मोटारसायकल सुपर मीटीयोर 650 लॉन्च केली, जी तीच्या जबरदस्त डिझाइन आणि फीचर्सने लोकांची मने जिंकत आहे.

येत्या काळात कंपनी 650 सीसी सेगमेंटमध्ये आणखीन बाईक लॉन्च करू शकते आणि त्यामध्ये टॉप सेलिंग मोटारसायकल क्लासिक 350चा जास्त पॉवरफुल व्हर्जन क्लासिक 650 सुद्धा असू शकते.

सध्या मार्केटमध्ये रॉयल एनफिल्डची 650 बाईक्स कंटिनेंटल जिटी 650, इंटरसेप्टर 650 आणि सुपर मीटीयोर 650 विक्रीसाठी उपलब्ध आहे. चला तर मग पाहूया, येणाऱ्या काळात जर क्लासिक 650 येणार असेल तर त्यामध्ये कोणकोणते खास फीचर्स मिळणार आहेत.

1.डिझाइन

काही काळापूर्वी माहिती आली होती की, रॉयल एनफिल्डने बाहेरील देशांमध्ये एक नवीन मोटर सायकलची टेस्टिंग सुरू केली आहे. जी सुपर मीटीयोर 650 आणि अपकमिंग शॉर्टगन 650 पासून वेगळी दिसते. या पावरफुल मोटर सायकलमध्ये राऊंड हॅण्डलॅम्प, डूअल एग्जोस्ट, नव्या डिझाईन सह एक टेललाईट आणि टर्न इंडिकेटर आणि टेलिस्कोपिक फॉक्र्स पाहायला मिळते

2. फीचर्स

मीडिया रिपोर्टनुसार रॉयल एनफिल्ड जेव्हा क्लासिक 650 लॉन्च करेल, तेव्हा त्यामध्ये अनेक प्रकारच्या खास गोष्टी पाहायला मिळतील. या अपकमिंग मोटार सायकलमध्ये ट्रिपल नेवीगेशन, चांगला आणि जास्त माहिती देणारा इन्स्ट्रुमेंट पॉड, ब्लूटूथ आणि स्मार्टफोन (Smartphone) कनेक्टिव्हिटी सोबत अनेक खास फीचर्स असणार आहे.

Royal Enfield classic 650

3. इंजिन असू शकते नवीन :

असे मानले जात आहे की रॉयल एनफिल्ड येणाऱ्या काळामध्ये एक क्लासिक 750 ला एक नवीन इंजिन सोबत लॉन्च केले जाऊ शकते, ज्यामध्ये उपलब्ध 650 बाइकच्या विरोधात चांगले परफॉर्मन्स पाहायला मिळू शकते. बाकी बाईकला अतिशय मस्कुलर अवतारमध्ये लॉन्च केले जाऊ शकते आणि याची संभावित किंमत (Price) चार लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. तुमच्या माहितीसाठी (Information) कंपनीने सध्या रॉयल एनफिल्ड क्लासिक 650 ला घेऊन कोणत्याही प्रकारची आधारित माहिती दिली नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

SCROLL FOR NEXT