Roast Bhutta Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Roast Bhutta Recipe : अगदी बाजारात मिळतो तसाच चटपटीत भाजलेला मका; 'या' टिप्सने घरीच बनवता येईल

Ruchika Jadhav

मुसळधार पाऊस आणि मिठ, लिंबू, मसाला लावून भाजलेला मका याचं कॉम्बिनेशन काहीतरी भन्नाटच आहे. प्रत्येक व्यक्तीला हा मका फार आवडतो. भाजलेला मका खाणे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. बाजारात गेल्यावर बऱ्याच ठिकाणी हात गाड्यांवर मका मिळतो. मात्र रस्त्यावरील पदार्थ पावसात बाहेर खावे वाटत नाहीत. त्यामुळे आज अगदी स्ट्रीट स्टाइल भाजलेला मका कसा बनवायचा याची माहिती जाणून घेणार आहोत.

गॅसवर भाजून घ्या मक्याचे कनीस

कोळसा किंवा मग रेतीशिवाय देखील आपण घरात मका भाजून खाऊ शकतो. त्यासाठी आधी भरलेले मक्याचे कनीस घ्या. मक्याच्या कनसावर असलेलं कवर काढून घ्या. त्यानंतर गॅसवर एक जाळी ठेवा. तुम्हाला बाजारात चपाती किंवा अन्य पदार्थ भाजण्यासाठी एक जाळी मिळते ती जाळी गॅसवर ठेवून घ्या. गॅसची फ्लेम लो ठेवा. त्यानंतर यावर मक्याचे कनीस ठेवून द्या. मक्याचे कनीस यावर छान भाजून घ्या.

कनीस भाजत असताना ते जळणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी कनीस सतत बदलत रहा. कनीस भाजत आल्यावर सर्वात आधी एक लिंबू कापून घ्या. त्यांनंतर एका प्लेटमध्ये मसाला आणि मिठ मिक्स करून घ्या. त्यानंतर कापलेला लिंबू या मसाल्यामध्ये चोळून घ्या. तसेच लिंबासकट मक्याच्या कनसावर लावून घ्या. असे केल्याने मक्याच्या कनीसमध्ये सर्व मसाले मुरतील.

ओव्हनमध्ये कनीस भाजून घ्या

तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा कनीस भाजून घेऊ शकता. त्यासाठी फॉइल पेपर घ्या. त्यामध्ये कनीस ठेवून घ्या. सोलले कनीस चांगल्या पद्धतीने तेल लावून भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्येच ते ओव्हनमध्ये ठेवा. ओव्हनमध्ये कनीस भाजण्यासाठी ते आधी प्री हिट करून घ्या. त्यानंतर १० मिनिटांनी तुम्ही याला मिठ आणि लिंबू तसेच तिखट लावून भाजू शकता.

उकडवून घ्या

चटपटीत मक्याचं कनीस खायचं असेल तर त्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे तुम्ही घरातल्या साध्या प्रेशर कुकरचा सुद्धा वापर करू शकता. त्यासाठी कनीस सोलून घ्या आणि कुकरमध्ये उकडवून घ्या. कनीस उकडत असतानाच त्यात मीठ टाकून घ्या. त्यानंतर उकडलेलं कनीस तुम्ही मसाला आणि हळद टाकून सुद्धा खाऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT