The Romantic Beginning of Valentine Week google
लाईफस्टाईल

Rose Day 2026: तुम्हीही प्रेयसीला गुलाब देणं टाळताय? मग ही माहिती वाचा... नातं होईल घट्ट, मिटतील वाद

Rose Day Meaning: Rose Day हा प्रेम, आपुलकी आणि भावना व्यक्त करण्याचा खास दिवस आहे. गुलाबांच्या रंगांमधून नात्यांना नवा अर्थ आणि संवादाला नवी दिशा मिळते.

Sakshi Sunil Jadhav

फेब्रुवारी हा महिना लोक प्रेमाचा महिना म्हणून प्रेयसीसोबत साजरा करतात. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात व्हॅलेंटाईन वीक सुरु होतो. त्यातला पहिला डे हा ७ फेब्रुवारी 2026 रोजी साजरा केला जातो. त्याला Rose Day म्हणतात. हा या प्रेमाच्या आठवड्याचा पहिला दिवस आहे. या दिवसापासून प्रेम, आपुलकी आणि नात्यांचं व्यक्त होणं सुरू होतं. तरुणाईसोबतच विवाहित जोडपी आणि मित्रपरिवारही हा दिवस उत्साहात साजरा करतात.

Rose Day 2026 का साजरा केला जातो?

Rose Day चा नेमका उगम स्पष्ट नसला तरी गुलाबाचे प्रेमाशी असलेले नातं प्राचीन आहे. रोमन संस्कृतीत गुलाब प्रेमाची देवी व्हिनस शी जोडला जातो. ग्रीक संस्कृतीमध्येही गुलाबाचा संबंध प्रेमाची देवी अ‍ॅफ्रोडाईट शी आहे. व्हिक्टोरियन काळात गुलाबांच्या रंगांद्वारे भावना व्यक्त करण्याची परंपरा सुरू झाली.

Rose Day 2026 चे महत्त्व

Rose Day हा प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात सोपा आणि सुंदर मार्ग मानला जातो. गुलाब देऊन प्रेम, मैत्री, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते.

हा दिवस संपूर्ण व्हॅलेंटाईन वीकसाठी सकारात्मक आणि रोमँटिक वातावरण निर्माण करतो. नात्यांमध्ये संवाद आणि भावना खुल्या मनाने मांडण्याची संधी मिळते. हा दिवस तरुणाई मोठ्या उत्साहात साजरा करते. काही कॉलेजमध्ये हे सगळे डे साजरा करण्याची परवानगी दिली जाते.

गुलाबांच्या रंगांचे अर्थ (Rose Colours Meaning)

लाल गुलाब

खोल प्रेम, निष्ठा आणि रोमँटिक भावना दर्शवतो.

गुलाबी गुलाब

आपुलकी, कृतज्ञता आणि सौम्य प्रेमाचे प्रतीक आहे.

पांढरे गुलाब

शुद्धता, शांतता आणि नवीन सुरुवातीचा संकेत देतो.

पिवळे गुलाब

मैत्री, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो.

इतर रंगांचे अर्थ

नारंगी गुलाब

आकर्षण आणि उत्साह दर्शवतो.

जांभळा गुलाब

पहिल्या नजरेतील प्रेम सूचित करतो.

निळा गुलाब

रहस्यमय भावना आणि अद्वितीय नात्याचे प्रतीक आहे.

मिश्र रंगांचा गुलदस्ता

विविध भावना एकत्र व्यक्त करतो.

Rose Day 2026 हा फक्त गुलाब देण्याचा दिवस नसून, तो नात्यांना नवे अर्थ देण्याचा खास क्षण आहे. एक गुलाबही अनेक भावना व्यक्त करू शकतो. म्हणूनच प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. त्यामुळे नात्यामधले राग रुसवे विसरुन एक गुलाब आपल्या प्रिय व्यक्तीला जरुर द्यावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamilnadu Tourism: तमिळनाडूमधील प्रसिद्ध 5 हिल स्टेशन; एकदा गेलात की परत यावेसे वाटणार नाही

West Bengal Politics: भाजप कार्यकर्त्याची हत्या, टीएमसी नेत्यासह ५ जणांना अटक

Maharashtra News Live Update: कासा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार,रोहित पवारांनी घेतली पीडितेच्या कुटुंबाची भेट

JIO Recharge : चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाला तरी नाही होणार नुकसान; कसा मिळेल रिफंड?

BEST Jobs: बेस्टमध्ये काम करण्यांची संधी, 686 कर्मचाऱ्यांची भरती; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT