मुंबई : टेक्लोलॉजी (Technology)जशी बदलत गेली तशी नवनवीन गॅजेट्स आपल्याकडे येऊ लागले. मोबाईल अॅक्सेसरीजमध्येही अनेक गॅजेट्स आहेत जे अनेकजणांच्या रोजच्या सवयींचा भाग झाले आहे. यात हेडफोन्स, इयरफोन्स, इअरबड्स यांचाही समावेश आहे. त्यामुळे यांची डिमांडही जास्त आहे. मात्र याच्या अतिवापरामुळे गंभीर आजाराच्या समस्या उद्भवू शकतात, असं एका रिसर्चमधून समोर आलं आहे.
इयरफोन सतत वापरल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. यातून निघणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे अनेक आजारांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. यामुळे बहिरेपणा देखील येऊ शकतो. अत्यंत भयानक म्हणजे ब्रेन कॅन्सरचा (Cancer) देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्लूटूथ आणि फोन किंवा इतर उपकरणांचे कनेक्शन रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशनच्या मदतीने केले जाते. या कारणास्तव, ब्लूटूथ हेडफोनमध्ये कोणतीही केबल किंवा वायर वापरली जात नाही. याबाबत अमेरिकेच्या द युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो येथील बायोकेमिस्ट्रीचे प्रोफेसर जेरी फिलिप्स यांचा एक रिसर्च प्रसिद्ध झाला आहे. या रिसर्चनुसार ब्लुटुथ किंवा वायरलेस हेडफोन्समुळे ब्रेन कॅन्सरचा धोका आहे. कारण यामुळे ब्रेनमध्ये आधीच एखादा ट्युमर असल्यास त्याच्या वाढीस मदत करतात.
इतरही अनेक समस्या
वायरलेस हेडफोन्समधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे डोक्यावर विपरित परिणाम होतो. यामुळे डोकेदुखी, झोप न येणे यासारख्या समस्या होऊ शकतात. तसेच लाऊड म्युझिकमुळे बहिरेपणाचाही धोका आहे. कानाच्या पडद्यांवरही त्याचा परिणाम होतो. मोठ्या आवाजाच्या कंपनांमुळे कानाचे पडदे फाटण्याची शक्यता असते. सततच्या रेडिएशनमुळे ब्रेन टिश्यूचं नुकसान होऊ शकतं. यामुळे न्युरोलॉजिकल समस्या उद्धवू शकतात.
एकमेकांच्या इअरफोन्सच्या वापरामुळे इन्फेक्शनचाही धोका असतो. त्यामुळे नेहमी आपल्याकडे असलेलं इअरफोन वापरण्यास प्राधान्य दिलं पाहिजे. जर दुसऱ्यांच इअरफोन वापरायचं असल्यास ते नीट स्वच्छ करुन घ्यावे.
उपाय काय?
>> ब्लूटुथ इअरफोनचा जास्त वापर टाळावा.
>> जास्त वेळ म्युझिक आणि सिनेमा पाहण्यासाठी स्पिकरचा वापर करावा.
>> स्वस्त इअरफोन ऐवजी क्वालिटी इअरफोन्सचा वापर करावा.
>> झोपताना फोनसह इतर गॅजेट्स शरीरापासून दूर ठेवावे.
>> इफरफोनवर गाणी ऐकताना मोठ्या आवाजात ऐकू नये.