Weight Gain saam tv
लाईफस्टाईल

Weight Gain: वाढत्या वजनामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब

Medical Research: नव्या संशोधनानुसार तरुण वयात वाढणारं वजन भविष्यात कॅन्सरचा धोका वाढवू शकतं. लठ्ठपणा, हार्मोन असंतुलन आणि सूज यामुळे विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वाढतं वजन केवळ तुमचं दिसणं बिघडवत नाही तर अनेक गंभीर आजारांनाही निमंत्रण देत असल्याचं वारंवार समोर आलय. आता एका नव्या संशोधनातून आणखी एक धक्कादायक बाब उघड झालीये. तरुण वयापासून वाढणारं वजन भविष्यात कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवू शकतं, असं या अभ्यासात आढळून आलंय. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं हे केवळ फिट दिसण्यासाठी नव्हे, तर गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठीही महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

संशोधनात काय आढळलं?

medRxiv जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात 6 लाखांहून अधिक लोकांचा समावेश करण्यात आला होता. संशोधकांनी 17 ते 60 वयोगटातील महिला आणि पुरुषांच्या वजनातील बदलांचा दीर्घकाळ अभ्यास केला. त्यानंतर वजनातील वाढ आणि कॅन्सरच्या घटनांची तुलना करण्यात आली.

अभ्यासातून असं दिसून आलं की, ज्या लोकांचं वजन जास्त होतं किंवा कालांतराने वाढलं होतं, त्यांच्यामध्ये लठ्ठपणाशी संबंधित कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या जास्त होता. म्हणजेच फक्त लठ्ठपणाच नव्हे, तर सातत्याने वाढणारं वजनही कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतं.

पुरुष आणि महिलांमध्ये वेगळे परिणाम

या संशोधनात, लठ्ठपणामुळे पुरुषांमध्ये एकूण कॅन्सरचा धोका सुमारे 7 टक्क्यांनी वाढलेला दिसून आला. तर महिलांमध्ये हा आकडा 17 टक्क्यांहून अधिक होता. याशिवाय, जास्त वजन असलेल्या महिलांमध्ये एंडोमेट्रियल कॅन्सरचा धोका जवळपास चार पट अधिक असल्याचं आढळलं. तर पुरुषांमध्ये यकृताच्या कॅन्सरचा धोका दोन ते तीन पट अधिक असल्याचं संशोधकांनी नोंदवलं.

लठ्ठपणामुळे कोणत्या कॅन्सरचा धोका वाढतो?

अभ्यासानुसार, काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर वाढत्या वजनाशी थेट संबंधित असू शकतात. यामध्ये यकृताचा कॅन्सर, अन्ननलिकेचा (इसोफेगस) कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर, किडनीचा कॅन्सर तसंच कोलोरेक्टल कॅन्सर यांचा समावेश आहे. संशोधकांच्या मते, लठ्ठपणामुळे या आजारांचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो.

वजन वाढण्यामागील कारणं कोणती?

शास्त्रज्ञांच्या मते, वजन वाढणं किंवा लठ्ठपणा निर्माण होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन, इन्सुलिनची वाढलेली पातळी, शरीरात सतत राहणारी सूज (इन्फ्लेमेशन) आणि चरबीच्या पेशींची वाढलेली संख्या ही त्यामागील प्रमुख कारणं मानली जातात. हीच कारणे पुढे जाऊन कॅन्सरचा धोका वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी काय करावं?

तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी सर्वप्रथम वजन नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. शरीराचं वजन संतुलित राखल्यास अनेक गंभीर आजारांपासून बचाव होऊ शकतो.

याशिवाय दररोज नियमित व्यायाम करणं, योगासनं करणं आणि एक्टिव्ह जीवनशैली फायदेशीर ठरते. आहारात पौष्टिक आणि संतुलित पदार्थांचा समावेश करावा. तसंच जंक फूड, जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ शक्य तितके टाळावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT