Child health risks SAAM TV
लाईफस्टाईल

Screen time kids: वाढता स्क्रीन टाइम मुलांसाठी धोकादायक ठरतोय का? डॉक्टरांनी सांगितले गंभीर परिणाम

Child health risks: मुलांमध्ये वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे लठ्ठपणा, झोपेचे त्रास आणि मानसिक समस्या वाढत आहेत. तज्ज्ञांचे सल्ले आणि पालकांसाठी महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या डिजिटल युगात मुलांच्या दैनंदिन जीवनात मोबाईल, टॅब, टीव्ही आणि इतर स्क्रीनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. या वाढत्या स्क्रीन टाइममुळे लठ्ठपणा, झोपेचे त्रास, चुकीच्या खाण्याच्या सवयी, डोळ्यांवर ताण आणि वागण्यात बदल अशा समस्या निर्माण होत असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अॅण्ड चिल्ड्रनमधील बालरोग एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. कोचुरानी अब्राहम यांनी दिलीये

ऑनलाइन शिक्षण, मोबाईल गेम्स, सोशल मीडिया आणि डिजिटल उपकरणं सहज उपलब्ध होतात. यामुळे ५ ते १६ वयोगटातील मुले दिवसातील मोठा वेळ स्क्रीनसमोर घालवत आहेत. त्यातच पालकांची धावपळ आणि मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी त्यांना मोबाईल देण्याची वाढती सवय, या सगळ्यामुळे मुलांचं स्क्रीनवर जास्त वेळ खर्चिक होतो.

डॉ. कोचुरानी अब्राहम सांगतात की, दीर्घकाळ स्क्रीनसमोर बसल्यामुळे मुलांची शारीरिक हालचाल कमी होते. अनेकदा ते एकाच ठिकाणी बसून सतत काहीतरी खात राहतात. ज्यामुळे वजन वेगाने वाढण्याची शक्यता असते. काही मुलं दिवसाला ३ ते ४ तास मोबाईलमध्ये गुंतलेली असतात. व्यायाम करत नाहीत आणि त्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. स्क्रीन पाहत जेवण्याची सवय लागल्याने किती आणि काय खाल्लं जातं याकडे लक्ष राहत नाही. परिणामी खाण्याच्या समस्या विकार आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात.

डॉ. अब्राहम यांनी पुढे सांगितलं की, वाढलेल्या स्क्रीन टाइमचा मुलांच्या मेंदूच्या विकासावरही परिणाम होऊ शकतो. त्यांची एकाग्रता कमी होणं, लक्ष विचलित होणं आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येणं अशा समस्या दिसून येतात. अशा मुलांमध्ये ब्रेन फॉग, विसरभोळेपणा, गोंधळ, चिडचिड, अस्वस्थता, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढू शकते. सोशल मीडियाचा जास्त वापर केल्यास मुले स्वतःची तुलना इतरांशी करू लागतात, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो.

पालकांनी लक्ष देणं गरजेचं

पालकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांसाठी ठराविक दिनक्रम तयार करणं, स्क्रीन टाइम दिवसाला १ ते २ तासांपर्यंत मर्यादित ठेवणे आणि वाचन, मैदानी खेळ, चित्रकला, नृत्य, संगीत किंवा नवीन कौशल्ये शिकण्यास प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. कुटुंबाने एकत्रितपणे ‘स्क्रीन-फ्री’ वेळ घालवणं, घरात एकत्र बसून खेळ खेळणं किंवा शैक्षणिक कार्यक्रम पाहणं यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Monsoon Health Care: पावसाळ्यात वारंवार पोट बिघडतंय? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

Maharashtra News Live Update: ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT