Child Eye Care  Saam Tv
लाईफस्टाईल

Child Eye Care : सावधान ! पालकांनो, मुलांच्या डोळ्यांची काळजी घेताय ना ? बाहुलीचा रंग होतोय पांढरा व पिवळा, जाणून घ्या सविस्तर

Eye Problem : . सध्या स्क्रीन टाईम वाढल्यामुळे लहान लहान मुलांना डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजाराला बळी पडावं लागतंय.

डॉ. माधव सावरगावे

Retinoblastoma : उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. त्यातच खेळायच्या वयात मुलांचे अधिक लक्ष असते ते मोबाइलच्या स्क्रिनकडे. हल्लीच्या मुलांना बसून खेळ खेळण्यापेश्रा त्यांना अधिक रस आहे तो स्क्रिनचा.

सतत गेम खेळणे, मोबाइल (Mobile) किंवा टि.व्हीच्या स्क्रीनची त्यांना आवड निर्माण झाली आहे. सध्या स्क्रीन टाईम वाढल्यामुळे लहान लहान मुलांना डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजाराला (Disease) बळी पडावं लागतंय. मात्र, डोळ्याचा त्रास हा मुलांसाठी केवळ त्रासदायक नाही तर जीवघेणाही ठरतोय. लहान मुलांच्या डोळ्यात बाहुलीचा रंग पांढरा किंवा पिवळा दिसल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवायला हवे.

डोळयांचे (Eye) डॉक्टर महेश पाठक म्हणतात की, डोळ्यांचा कर्करोग असू शकतो. याकडे दुर्लक्ष केल्यास दृष्टी जाऊ शकतेच, परंतु चिमकुल्याच्या जिवलाही धोका निर्माण होतो.

डॉक्टराच्या मते सध्या टीव्ही, मोबाईलसोबत तंत्रज्ञानातील गॅजेट्सचा वाढता उपयोग आणि बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्ररोग वाढत आहे. यामध्ये पाच वर्षांच्या आतील मुलांना डोळ्यांचा रेटिना ब्लास्टोमा हा कर्करोग सातत्याने वाढत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली. हा कर्करोग प्रामुख्याने लहान मुलांमध्येच उद्भवतो. एक ते दीड वर्षांच्या मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. या आजाराचे लवकर निदान होत नाही.

1. रेटिनो ब्लास्टोमा का होतो?

  • आई-वडिलांना रेटिनो ब्लास्टोमाचा आजार झालेला असेल तर वंशपरंपरेने तो बालकांनाही होऊ शकतो.

  • त्याशिवाय गुणसुत्रांतील दोषांमुळेही लहान मुलांना डोळ्यांचा कॅन्सर होण्याची भीती असते.

2. लक्षणे

  • डोळ्यांची बाहुली पांढरी, पिवळी होणे.

  • अशी लक्षणे असतील तर याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे आहे.

  • मुलांच्या डोळ्यातील बाहुलीचा रंग पांढरा, पिवळा होणे हे रेटिनो ब्लास्टोमाचे लक्षण आहे.

  • शिवाय डोळ्याभोवती सूज, डोळे सतत लाल होणे, आदी प्रकार होत असतील तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने रेटिनो ब्लास्टोमाची तपासणी करणे गरजेचे आहे.

3. कशी घ्याल काळजी ?

मुलं जशी नाजूक असतात, तशी त्यांचे डोळेही नाजूक असतात. आता त्या नाजूक डोळ्यांना रेटिनो ब्लास्टोमा हा डोळ्यांचा कर्करोग लागण झाली तर डोळे जातील. वंशपरंपरेने हा आजार होऊ शकतो. शिवाय गुणसूत्रातील दोषही याला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे पालकांनी, मुलांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. शिवाय काही लक्षणे दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपचार घ्यावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT