२६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. या दिवासाला राष्ट्रीय दिन म्हणूनही साजरा केले जाते. सुट्टीच्या दिवशी सगळेच घरी असतात. यंदा लाँग वीकेंड आल्यामुळे आपल्या घरी पाहुणे येतात.
घरी पाहुणे आल्यामुळे नेमके काय बनवायचे हा प्रश्न अनेकांना पडतो. या दिवशी जर तुम्हालाही नवीन काही ट्राय करायचे असेल तर तुम्ही देखील तिरंगी डोसा रेसिपी करु शकता. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच याची चव चाखता येईल. तिरंगी डोसा कसा बनवायचा पाहूया.
1. साहित्य
तिरंगा डोसा बनवण्यासाठी साहित्य-
पांढऱ्या रंगासाठी-डोसा पीठ
केशरी रंगासाठी- गाजरमध्ये २ ते ३ चमचे पाणी (Water) घालून मिक्सरमध्ये बारीक करा.
हिरव्या रंगासाठी - धणे, हिरवी मिरची, मीठ आणि २ चमचे पाणी मिक्सरमध्ये मिसळा आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा.
2. कृती
तिरंगा डोसा (Dosa) बनवण्यासाठी प्रथम डोसा तवा गरम करा.
या तव्यावर तेलाचे (Oil) काही थेंब टाका आणि पसरवून घ्या.
यानंतर सर्वात आधी तव्यावर केशरी रंगाचे पीठ घालून पसरवून घ्या.
पांढरे पीठ मधोमध ठेवून हलक्या हाताने पसरवा.
सगळ्यात शेवटी हिरव्या रंगाचे पीठ तव्यावर परसरवून घ्या.
त्यानंतर मंद आचेवर शिजवून घ्या. डोसा शिजल्यानंकर तो उलटून त्याची दुसरी बाजू तयार करा.
तयार आहे कुरकुरीत तिरंगी डोसा. खोबऱ्याची चटणी, हिरवी चटणी आणि लाल चटणीसोबत सर्व्ह करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.