Affordable 7 Seater Car - Renault Triber Saam tv
लाईफस्टाईल

Affordable 7 Seater Car: मोठ्या कुटुंबांना बेस्ट आहे 'ही' कार; स्वस्तात खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Affordable 7 Seater Car: मोठ्या कुटुंबासाठी खास कार ही सात लाखांपर्यंत घरी आणू शकता. या खास कारचे फिचर जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

Affordable 7 Seater Car:

पहिल्यांदा कार विकत घ्यायचा विचार करत असाल आणि स्वस्तात कार विकत घ्यायचा मानस असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. मोठ्या कुटुंबासाठी बाजारात खास कार उपलब्ध झाली आहे. या कारमध्ये सातहून अधिक प्रवासी बसू शकतात. मोठ्या कुटुंबासाठी खास कार ही सात लाखांपर्यंत घरी आणू शकता. या खास कारचे फिचर आणि किंमत जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

मीडिया वृत्तानुसार, रेनॉल्ट ट्राइबर ही सात सीटर कार देशातील सर्वसामान्यांना परवडणारी स्वस्त कार असल्याचं बोललं जात आहे. ही कार बाजारात किंमत ६.३ लाख ते ८.९७ लाखापर्यंत (एक्स शोरूम) उपलब्ध आहे.

या कारमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी सुटसटीत जागा आहे. तसेच कंपनीकडे कारचे RXE,RXL, RXT आणि RXZ हे चार व्हेरिएंट आहेत. या कारमध्ये ८४ लीटर बूट स्पेस आहे. तसेच सीटच्या खाली हा स्पेस हा ६२५ लीटरपर्यंत वाढवता येऊ शकतो.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्लेसोबत ८ इंच टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम, चांगली ड्रायव्हर सीट, स्टेयरिंग-माउटेन्ड ऑडिओ आणि मोबाइल फोन कनेक्टिविटी सारखे फिचर उपलब्ध आहेत.

यासोबत या कारमध्ये पूश बटन स्टार्ट/स्टॉप ,सेंटर कन्सोलमध्ये कूल्ड स्टोरेज आणि डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर देखील मिळत आहेत. या कारच्या टॉप व्हेरिएन्टमध्ये स्मार्ट कार्ड अॅक्सेस देखील आहे.

प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी , हिल स्टार्ट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखे फिचर उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त चार एअरबॅग, ईबीडीसोबत एबीएस, रियर पार्किंग सेन्सर आणि रियर-क्यू कॅमेरा देखील उपलब्ध आहेत. यासोबत ही कार ४-स्टार NCAP रेटिंगसोबत येत आहे.

तसेच या कारमध्ये १-लीटर नॅचरली एस्पिरेटेड ३ सिलिंडर पेट्रोल इंजिन मिळते. ७२ बीएचपी पॉवर आणि ९६ एनएम पीक टॉर्क तयार करण्यास सक्षम आहे.कारची स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड एएमटी गियरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याचं हिवाळी अधिवेशन फक्त ८ दिवसांचं, कारण काय? VIDEO

महाराष्ट्राचा 'जलपुरूष' हरपला! शरद पवारांचे खंदे समर्थक माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांचं निधन

Maharashtra Live News Update: - भगीरथ भालके यांच्यावर गुन्हा दाखल

Supermoon Date And Time: चंद्र येणार पृथ्वीच्या अगदी जवळ... सुपरमून दिसणार, कधी आणि किती वाजता? जाणून घ्या

Hindu Wedding Ritual: लग्नामध्ये नवरी वराच्या डाव्या बाजूला का बसते? कारण काय?

SCROLL FOR NEXT