Control Blood Pressure SAAM TV
लाईफस्टाईल

Control Blood Pressure : सावधान! ब्लड प्रेशर वाढतोय? नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय वाचा

Shreya Maskar

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे ब्लड प्रेशरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्यायामाचा अभाव, बाहेरचे खाणे, वाढता ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निमार्ण होते. यामुळे हृदयाचे आरोग्य देखील खराब होते. डॉक्टरांच्या औषधोपचारासोबत योग्य पद्धतीने स्वतःची काळजी घेतल्यास तुम्ही ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवू शकता. ब्लड प्रेशरची समस्या असल्यास डोकेदुखी, श्वास घेण्यात अडचणी, चक्कर येणे इत्यादी समस्या उद्भवतात. ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या.

पौष्टिक आहार

ब्लड प्रेशर वाढत असेल तर आपल्या आहारावर विशेष लक्ष केंद्रीत करावे. आपल्या डाएटमध्ये फळांचा, पालेभाज्यांचा समावेश करावा. ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी उपवास करू नये. तसेच त्यांनी जेवणाची वेळ पाळणे गरजेचे आहे. वेळेवर जेवण न केल्यास ब्लड प्रेशर वाढू शकते. दिवसातून तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी रोजच्या आहारात खजूर, दालचिनी, मनुका, गाजर आणि आल्याचा रस इत्यादी पदार्थांचा समावेश करावा. रोजच्या आहारात बाहेरचे जंक फूड खाणे टाळा.

वजन नियंत्रणात ठेवणे

जास्त वजन असल्यास ब्लड प्रेशर वाढते. त्यामुळे जास्त गोड पदार्थ खाणे टाळा. कारण गोड पदार्थांमुळे वजन झपाट्याने वाढते. लठ्ठपणा हा उच्च रक्तदाबावर धोकादायक ठरतो.

मिठाचे जास्त सेवन टाळा

रोजच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे. जास्त मीठ खाल्ल्यास ब्लड प्रेशर वाढते. मीठामध्ये असलेले सोडियमचे प्रमाण ब्लड प्रेशर वाढवण्यास कारणीभूत ठरते. तसेच उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

ताण-तणावापासून दूर

उच्च रक्तदाबाचे मूळ कारण वाढता ताणतणाव आहे. त्यामुळे चिंतामुक्त आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.

व्यायाम

नियमित व्यायाम आणि मेडिटेशन केल्यास ताणतणाव कमी होण्यास मदत होतो. तसेच शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते.

चीज खाणे टाळा

चीज हा दुग्धजन्य पदार्थ आहे. तसेच त्यामध्ये कॅल्शियमसोबत सोडियमचे प्रमाण जास्त असते. जे शरीरातील रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते.

लोणचे खाऊ नये

लोणचे दीर्घकाळ टिकवून राहण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मीठ घातले जाते. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी लोणचे खाणे टाळा.

मद्यपान करणे टाळा

जास्त प्रमाणात दारू प्यायल्यास रक्तदाब वाढू शकतो. तसचे तुमच्या ब्लड प्रेशरच्या औषधांचा देखील आरोग्यावर परिणाम होणार नाही.

तळलेले पदार्थ खाणे टाळा

जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाणे टाळा. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढून उच्च रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT