Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips: लव्ह मॅरेजसाठी पालकांची परवानगी मिळवायची आहे? 'या' टीप्स नक्की फॉलो करा

How To Convince About your Love Marriage: प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती आपले नाते टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. आपल्या नात्याला कुटुंबाची परवानगी मिळावी असे प्रत्येक जोडप्याचं स्वप्न असतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती आपले नाते टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. आपल्या नात्याला कुटुंबाची परवानगी मिळावी असे प्रत्येक जोडप्याचं स्वप्न असतं. आपलं लव्ह मॅरेज कुटुंबियांनी मान्य करावे, असं प्रत्येकालाच वाटतं. परंतु आजही भारतात अनेकजण लव्ह मॅरेजला परवानगी देत नाही.

प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाची किंवा मुलीची काळजी असते. त्यामुळे आपल्या मुलीने आम्ही निवडलेल्या मुलाशी लग्न करावे, असं पालकांना वाटते. पालकांना तुमचे लव्ह मॅरेज पटवून देण्यासाठी तुम्हाला खूप संयम ठेवावा लागेल. तुम्ही तुमच्या लव्ह मॅरेजबद्दल घरच्यांना पटवून देताना या टीप्स नक्की फॉलो करा.

संवाद

पालक आणि मुलांमधील संवाद खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना तुमच्या पार्टनरबद्दल सांगायचे असेल तर तुम्ही पालकांशी संवाद साधायला हवे. अनेकदा लव्ह मॅरेजबद्दल बोलताना पालक आणि मुलांमध्ये भांडणे होतात. अबोला होतो. परंतु तरीही तुमच्यातील संवाद कमी होऊ देऊ नका. तुम्हाला मित्र बनून पालकांना लव्ह मॅरेजबद्दल पटवून द्यावे लागेल.

लग्नाची चर्चा

पालकांशी संवाद साधताना अधून मधून लग्नाची चर्चा करा. पालकांच्या अपेक्षा जाणून घ्या. त्यांना त्यांची सून किंवा जावई कसा हवा आहे, हे आधी जाणून घ्या. त्यानंतर हळूहळू आपल्या पार्टनरबद्दल कुटुंबियांना सांगावे.

पालकांना विश्वासात घ्या

पालकांशी संवाद साधताना त्यांचा तुमच्यावर विश्वास बसेल अशा पद्धतीने संवाद साधा. किमान आई किंवा बाबांना विश्वासात घेऊन आपल्या पार्टनरची ओळख पटवून द्या. त्यानंतर तिच्याबद्दल माहिती सांगा. त्यानंतर आई बाबांना तुमच्या पार्टनरची माहिती देईल. सर्व गोष्टी समजावून सांगतील.

जोडीदार- कुटुंबियांची भेट घालून द्या

यानंतर तुम्ही तुमच्या पार्टनरची कुटुंबियांशी ओळख करुन द्यावी. कुटुंबियांना भेटवण्याआधीच तुम्ही तुमच्या घरच्यांची माहिती पार्टनरला द्या. जेणेकरुन पार्टनरला त्या व्यक्तीसमोर कसे वागावे हे समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT