True Love Test Saam TV
लाईफस्टाईल

True Love Test : तुमच्या पार्टनरचं तुमच्यावर खरं प्रेम आहे की खोटं? 'या' हिंटने होईल स्पष्ट

True Love or Fake Love Test Relationship : पार्टनरच्या प्रेमाची परिक्षा घेण्यासाठी आणि त्याची पारख करण्यासाठी आम्ही काही सिंपल ट्रीक्स खास तुमच्यासाठी आणल्या आहेत. या हिंट्सने तुम्हाला पार्टनच्या प्रेमाचा अंदाज येईल.

Ruchika Jadhav

आपल्या पार्टनसाठी प्रत्येक व्यक्तीच्या मनात कधी ना कधी शंका निर्माण होते. आपला प्रियकर किंवा प्रेयसीचं खरोखर आपल्यावर प्रेम आहे की ते फक्त प्रेम असल्याचं नाटक करत आहेत, असा प्रश्न तुमच्याही मनात कधी ना कधी आलाच असेल. त्यामुळे पार्टनरच्या प्रेमाची परिक्षा घेण्यासाठी आणि त्याची पारख करण्यासाठी आम्ही काही सिंपल ट्रीक्स खास तुमच्यासाठी आणल्या आहेत. या हिंट्सने तुम्हाला पार्टनच्या प्रेमाचा अंदाज येईल.

गोष्टी लपवण्याची सवय नसावी

आपलं ज्या व्यक्तीवर भरपूर प्रेम आहे आपण त्याच्यापासून कोणतीही गोष्ट लपवत नाही. उलट आपल्या जोडीदाराला आपण आपल्या सर्व अडचणी मनमोकळेपणाने सांगत असतो. जर तुमचा पार्टनर तुम्हाला काही स्पष्ट सांगत नसेल गोष्टी लपवून ठेवत असेल, तर समजून जा त्याचं तुमच्यावर खरं प्रेम नाही.

सपोर्ट करणारा असावा

तुमचा पार्टनर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवीनवीन गोष्टी करण्यासाठी कायम मदत करणारा असावा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेटण्यापासून तुमचा पार्टन रोखत असेल. तुमची काळजी वाटते असं कारण सांगून तुमच्यावर संशय घेत असेल तर त्याचे तुमच्यावर खरे प्रेम नाही. अशा पार्टनपासून आजच दूर निघून जा.

अडचणीत साथ न सोडणे

आपल्या आयुष्यात विविध टप्प्यांवर विविध आव्हाने उभी असतात. अशावेळी आपल्यावर चिडचिड न करता पार्टनरने आपली साथ द्यायला हवी. जो पार्टनर आपल्याकडे काहीच नसताना आपला स्विकार करतो तो जगातला बेस्ट पार्टनर असतो. मात्र तुमचा पार्टनर तुमच्या अडचणीच्या काळात तुम्ही कसे चुकलात, तुम्ही काय काय चूका केला ज्यामुळे हे संकट ओढावलं हेच सागंत असेल तर तो तुमच्यावर खरं प्रेम करत नाही.

वचन पूर्ण करणे

रिलेशनशिपमध्ये प्रत्येक जोडपं एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याचे वचन करत असतात. हे वचन दोघांनीही पाळले पाहिजे. मात्र काही पार्टनर आपल्या आई वडिलांचे नाव पुढे करून जोडीदाराची साथ सोडतात आणि वचन मोडतात. तर काही व्यक्ती समोरच्याला फार त्रास देतात आणि वचन मोडण्यास भाग पाडतात. अशी नाती फार काळ टिकत नाहीत.

चार माणसांमध्ये आदर करा

खरं प्रेम हे फक्त बंद दाराआड नाही तर चार माणसांमध्ये दिसलं पाहिजे. तुमचे आईवडिल तुमच्यासोबत असताना तुमचा पार्टनर तुमच्याशी कसे वागतो यावर त्याचं खरं प्रेम ठरतं. काही पार्टनर आपल्या पत्नीला आई वडिलांसमोर जास्त मान देत नाहीत किंवा सर्व एकत्र असताना पार्टनरलासोबत राहू देत नाहीत, पार्टनरपासून दूर पळतात, सर्वांसमोर दूर ढकलतात. तुमचा पार्टनर देखील तुम्हाला असे करत असेल तर त्याला आजच सोडून द्या आणि मोकळा श्वास घेत नव्या आयुष्याला सुरुवात करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अनैतिक संबंधात अडसर, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; नागपुरमध्ये खळबळ

Beed : ...नाहीतर तुझी बायकोला घरी पाठव, बीडमध्ये व्यापार्‍याने केली आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

SCROLL FOR NEXT