Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : जोडीदारासोबत नाते अधिक मजबूत बनवायचे आहे ? तर, 'या' टिप्स फॉलो करा

नातं हे एखाद्या रोपासारखे असते. आपण त्याची जशी काळजी घेऊ तसे ते फुलत जाते.

कोमल दामुद्रे

Relationship Tips : आपल्या प्रत्येकाला असे वाटते की, आपले नाते अधिक घट्ट व मजबूत असायला हवे. कोणतेही नाते अधिक मजबूत ठेवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. नात हे एखाद्या रोपासारखे असते. आपण त्याची जशी काळजी घेऊ तसे ते फुलत जाते. असेच काहीसे जोडप्यांमधील नातेसंबंधातही असते. नाते घट्ट होण्यासाठी जोडप्यामध्ये बंध असणे आवश्यक आहे. बंध दृढ होण्यासाठी जोडप्यांनी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

जेव्हा त्यांच्यातील बंध मजबूत असेल तेव्हा ते एकमेकांना काहीही न बोलता त्यांचा दृष्टिकोन समजून घेतात. त्याच वेळी, कोणतीही व्यक्ती किंवा गोष्ट कोणत्याही कारणामुळे तुमच्या नात्यात येऊ शकणार नाही. नाते वर्षानुवर्षे मजबूत राहील आणि प्रेम कमी होऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक जोडप्याने आपले नाते घट्ट करण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून जोडीदारासोबतचे त्यांचे नाते कधीही तुटू नये. (Relationship Tips In Marathi)

1. चित्रपट पाहायला जा -

Watching Movie

जोडीदाराला त्याच्या जोडीदारासोबत वेळ घालवायचा असतो. तुम्ही एकमेकांसोबत रहात असाल किंवा बहुतेक वेळ एकमेकांशी बोलत असाल, पण जोडीदारासोबतचे नाते घट्ट करण्यासाठी त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवायला हवा. एकत्र राहून चालणार नाही, त्यांच्यासोबतही वेळ घालवा. जसे की जोडपे दर आठवड्यात किंवा महिन्यातून एकदा एकत्र चित्रपट पाहू शकतात. जर तुम्हाला थिएटरमध्ये जायचे नसेल तर तुमच्या जोडीदाराचा आवडता चित्रपट घरी एकत्र बघा.

2. एकमेकांच्या कुटुंबांसोबत वेळ घालवा -

Spending time with family

जोडप्यांमधील (Partner) मजबूत बाँडिंगसाठी, हे आवश्यक आहे की तुमचे बाँडिंग जोडीदाराच्या कुटुंबाशी देखील असले पाहिजे. यासाठी वर्षातून किमान एक किंवा दोनदा तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबीयांना घरी बोलावून त्यांना एकत्र मिसळून त्यांच्यासोबत नाते निर्माण करा. यामुळे तुमच्या जोडप्यामधील बंधही घट्ट होतील.

3. ट्रिपला जा

Planning Trip

एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी या जोडप्याने वर्षातून एकदा तरी सहलीला (Trip) जावे. दोघेही आपापल्या कामात कितीही व्यस्त असले तरी एकमेकांना वेळ द्यायला विसरू नका.

4. बजेट बनवा

Budget Plan

अनेकदा आर्थिक कारणांमुळेही जोडप्यांमध्ये भांडणे होतात. जोडीदारासोबत मजबूत नाते निर्माण करण्यासाठी कुटुंबाच्या भविष्याची योजना करणे आवश्यक आहे. यासाठी वार्षिक बजेट बनवा म्हणजे भविष्यात किती खर्च करायचा आणि किती पैसा ठेवायचा हे ठरवता येईल. तुमच्या जोडीदाराशीही पैसे गुंतवण्याबद्दल बोला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT