Relationship Tips 
लाईफस्टाईल

Relationship Tips: लग्नाच्या काही महिने आधी जोडप्यांनी एकत्र का करावा प्रवास? जाणून घ्या कारणे

Relationship Tips: लग्नानंतर नातं कसं टिकवलं पाहिजे. त्याच्यासाठी काय केले पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, बरीच कानमंत्र दिली जातात. परंतु लग्नानंतर दोघांच्या आवडीनिवडीमुळे होणारे वादाने अनेकांच्या नात्यात कटुता येत असते. त्यामुळे लग्नाआधी दोघांनी मुलगा आणि मुलीने एकमेकांचे मते जाणून घेतली पाहिजेत. पण ते कधी होईल, जेव्हा दोघेही एकत्र वेळ घालवतील तेव्हा. त्यासाठी लग्नाआधी दोघांनी एकत्र प्रवास केला पाहिजे.

Bharat Jadhav

लग्नबंधनात अडकल्यानंतर दोन हृदये जोडली जातात आणि एक नवीन नाते तयार होते. अशा परिस्थितीत प्रत्येक मुलीने आणि मुलाने लग्नापूर्वी एकत्र प्रवास करावा. त्यांनी काही दिवस छान ठिकाणी जावे. लग्नापूर्वीचा प्रवास हा मुलगा आणि मुलगी दोघांसाठी खास अनुभव देणारा असू शकतो. कारण त्यामुळे नातं घट्ट होतं आणि एकमेकांना जाणून घेणं सोपं होतं.

लग्नापूर्वी एकत्र प्रवास करणे हा जोडप्यांसाठी वेगळा अनुभव देणारे क्षण असतात. हे एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत त्यातून होते. नातेसंबंध मजबूत होत असतं.जर मुलगा आणि मुलगी लग्न करणार असतील तर लग्नाच्या काही महिने आधी दोघांनी एकत्र सहलीला जावे. याद्वारे ते एकमेकांचे व्यक्तिमत्त्व ओळखतात आणि नवीन नाते निर्माण करू लागतात.प्रवास करताना, मुलगा आणि मुलगी कोणतीही अडचण न येता त्यांच्या भावना एकमेकांशी शेअर करतात आणि संवाद कायम ठेवतात. लग्नाआधी सहलीला गेल्याने मुलगा आणि मुलगी काही अविस्मरणीय क्षण एकत्र एन्जॉय करतात.

प्रवासादरम्यान, मुलगा आणि मुलगी यांचा एकमेकांवर विश्वास निर्माण होतो, ते दोघे एकत्र जेवतात, फिरतात. यातून त्यांना एकमेकांच्या उणीवा आणि बलस्थाने कळतात. प्रवासादरम्यान मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या समस्या शेअर करतात आणि एकमेकांच्या समस्या सोडवण्याचे काम करतात.

लग्नाआधी मुलगा आणि मुलगी सहलीला गेले तर ते एकमेकांची सहज परीक्षा घेतात. जर त्यांना कोणतीही अडचण आली किंवा त्या दोघांचे आवडीनिवडी किंवा एकमेकांना मत पटली नाही तर ते लग्नाला नकार देऊ शकतात. यामुळे त्यांना लग्नानंतर घटस्फोटासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही. प्रवास जोडप्यांसाठी एक नवीन नात्याला सुरुवात करून देणारं ठरत असत.

त्याचबरोबर लग्नापूर्वी जोडप्याने सहल काढणं हे मानसीकदृष्ट्या चांगलं असते. आपल्या होणाऱ्या नव्या नात्याविषयी अधिक जाणून घेता येते. तसेच समोरील व्यक्ती कशी असेल त्याबाबत आपल्या मनात काही शंका असतात, त्या शंका या सहलीतून किंवा प्रवासातून दूर होतात. त्यामुळे तुम्ही नव्या व्यक्ती आणि नात्याबाबत घेतलेला ताण कमी होत असतो. प्रवास जोडप्यांना जीवन जगण्यासाठी प्रेरित करते. लग्नापूर्वी एकत्र प्रवास करणाऱ्या मुला-मुलींना भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत नाही आणि सहज आनंदी जीवन जगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: XXX पैसे घे अन् चल निघ.. मनसे नेत्याच्या मुलाचा अर्धनग्न अवस्थेत राडा; मराठी इन्फ्लूएन्सरला भररस्त्यावर शिवीगाळ, VIDEO व्हायरल

Pune Metro : हिंजवडीची वाहतूक कोंडीची कटकट झटक्यात संपणार, या तारखेला धावणार मेट्रो

26/11 मुंबई हल्ला प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मास्टरमाइंड तहव्वूर राणाची कबुली; CSMT ची केली होती रेकी

Nashik News: नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर पर्यटक अडकले; पर्यटकांच्या सुटकेचा थरारक रेस्क्यू, पाहा,VIDEO

Hindustani Bhau On Raj Thackeray: मारणं खूप सोपं असतं पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्तानी भाऊची राज ठाकरेंना विनंती

SCROLL FOR NEXT