प्रेम ही अशी गोष्ट आहे जे कधी आणि कुठे भेटेल सांगता येत नाही. त्यात तरुण मुलं सिंगल असल्यास सतत प्रेमाच्या शोधात असतात. अशात काही दिवस एखाद्या मुलीशी बोलताना त्यांना ती मुलगी आवडू लागते. मुलीला सुद्धा आपण आवडत आहोत अशा वाइब्स येतात. मात्र मध्येच मुली त्या मुलांना भाऊ म्हणतात किंवा त्या वहिनीच्या रुपात समोर येतात.
बहीण
प्रेमात पडण्यासाठी कसलंही बंधन नसतं. मात्र जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते त्यावेळी काय करावे आणि काय करू नये हे मुलांना समजत नाही. अनेक मुलांसोबत अशा घटना घडल्या आहेत. त्यांना एखादी मुलगी आवडते, त्यामुळे ते तिच्याशी गप्पा करतात. तिच्या आवडी-निवडी जाणून घेण्यास सुरुवात करतात. तिला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न सुरू असताना मुलगी या सर्व प्रेमाला आणि काळजीला आदराचं नातं जोडते आणि भाऊ म्हणते. अशावेळी मुलांचं हृदय पूर्णता तुटतं.
वहिनी
काहीवेळा असंही होतं की मुलांना एखादी मुलगी आवडू लागते. मनातल्या मनात त्यांचं तिच्यावर प्रमेही जडतं. त्याच वेळी त्यांच्या दुसऱ्या एका मित्राला किंवा मग भावाला सुद्धा ही मुलगी आवडत असते. त्यामुळे काही दिवसांनी त्यांना आवडणारी मुलगी त्यांची वहिनी आहे असं मुलांना समजतं. आता वहिनी म्हणजे आई समान असलेली महिला. त्यामुळे मुलांना आपल्या फिलिंग्सचे काय करावे हेच समजत नाही.
या टिप्स फॉलो करा
जेव्हा आवडणारी मुलगी तुम्हाला भाऊ म्हणते त्यावेळी तिला वाईट वाटेल असं काहीच बोलू नका. भावाचं नातं फार मोठं आणि रक्षण करणारं असतं. एखाद्या तरुणीला तुम्ही तिची भावाप्रमाणे काळजी घेता असे वाटले तर ही अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही अशावेळी स्वत:ला सावरण्यासाठी तिच्यापासून दूर जा आणि प्रेयसी म्हणून तुमच्या डोक्यातील आणि मनातील तिच्याविषयीच्या भावना पूर्णत: बंद करा.
दुसऱ्या मुलीचा विचार करा
जेव्हा तुम्हाला तुमच्या आवडत्या तरुणीबद्दल असे काही समजते तेव्हा तिच्यापासून दूर जा. तसेच या विचारातून लवकरात लवकर मूवऑन व्हा. कारण तुम्ही जोपर्यंत दुसऱ्या मुलीचा विचार करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला दादा म्हटलेल्या तरुणीला विसरता येणार नाही.
मनातील भावना व्यक्त करा
अशी वेळ तुमच्यावर येण्याआधीच सतर्क व्हा. जर खरोखर तुम्हाला एखादी तरुणी आवडत असेल तर तिला मनातील गोष्टी लगेच सांगा. जास्तवेळ वाट पाहत राहू नका. तुम्ही मनातील भावना व्यक्त केल्यावर तरुणीने नकार दिला तर वेगळी गोष्ट आहे. मात्र तुम्ही तिला काहीच विचारू शकले नाही याचं दु:ख फार मोठं आहे. त्यामुळे तुमच्या मनात जे आहे ते बोलण्याची हिंमत ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.